Saturday, April 20, 2024

धोनीच्या मुलीचं मनोरंजन क्षेत्रात पहिलं पाऊल, ‘या’ जाहिरातीत बापासोबत झळकली लेक ‘झिवा’; पाहा व्हिडिओ

महेंद्र सिंग धोनी म्हणजेच सर्वांचा लाडका कॅप्टन ‘कूल’. ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने निवृत्तीची घोषणा केली. धोनीने आयपीएल सोडून सर्व क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, आणि सर्व क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. धोनी क्रिकेट खेळत नसूनही त्याची ब्रँड व्हॅल्यू यत्किंचितही कमी झाली नाहीय. अजूनही धोनी जाहिरातींसाठी पहिली पसंत आहे. आजही तो अनेक ब्रँड इन्डोर्स करतो. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी आज जाहिरातींमध्ये अनेक कंपन्या कलाकारांसोबत त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना देखील घेतात. कलाकारांचे मुलं म्हणजेच स्टार कीड आज सर्वात जास्त चर्चेत असतात.

या स्टार किड्स मधील एक नाव म्हणजे झिवा धोनी. महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ५ वर्षाची असूनही तिचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे आणि लाखो लोकं तिला फॉलो करतात. झिवाचे अनेक व्हिडिओ नेहमी इंटरनेटवर वायरल होतात. याच छोट्या झिवाने जाहिरातींच्या विश्वात पाऊल ठेवले आहे. झिवा आणि धोनीने सोबत एका बिस्कीटची जाहिरात केली आहे.

धोनी आणि झिवा हे कॅडबरी ओरिओ बिस्कीटच्या जाहिरातीमध्ये एकत्र आले आहेत. ही जाहिरात नुकतीच सोशल मीडियावर आली आहे. यातून वडील आणि मुलीची क्युट जोडी सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. या जाहिरातीने झिवाच्या लोकप्रियतेत अधिक वाढ होणार आहे हे नक्की.

सध्या धोनी हा चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल टीमचा कॅप्टन आहे. तसेच तो रांचीतल्या त्याच्या फार्म हाऊसमध्ये शेती करत आहे. त्याचे शेती करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल व्हिडिओ वायरल झाले होते.

हे देखील वाचा