अजूनही वेड लावतोय ‘चटक मटक’ गाण्यातील सपनाचा भन्नाट डान्स, मिळवले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज


गेल्या काही दिवसांपासून हरियाणवी गाण्यांची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. वाढदिवसाची पार्टी असो किंवा लग्नासारखा मोठा कार्यक्रम, लेटेस्ट हरियाणवी गाण्यांवर डान्स केला नाही, तर मजा अधुरीच राहते. रेणुका पंवार (Renuka Panwar) आणि सपना चौधरी (Sapna Choudhary) ही हरियाणवी इंडस्ट्रीतील अशी दोन नावे आहेत, ज्यांनी आपल्या गाण्यांनी सर्वत्र धमाल केली आहे. दोघीही अशा व्यक्ती आहेत, ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. सपना आणि रेणुका जेव्हा गाण्यात एकत्र परफॉर्म करतात, तेव्हा ते गाणे हिट झाल्याशिवाय राहत धमाल होते.

असेच एक गाणे म्हणजे ‘चटक मटक’ (Chatak Matak) जे सध्या सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात सपनाचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. सपनाचे ‘चटक मटक’ गाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाले होते. परंतु इतका वेळ उलटून गेल्यानंतरही हे गाणे टॉप ५ हरियाणवी गाण्यांच्या यादीत कायम आहे. रेणुकाने या गाण्याला आवाज दिला होता. (dancer sapna choudhary haryanvi song chatak matak high on desi flabour crosses 711 million views)

त्याचवेळी सपनाने या गाण्यात तिचा जबरदस्त डान्स दाखवला आहे. सपना ही उत्तम कलाकार असली, तरी तिच्या या गाण्यातील डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘चटक मटक’मधील तिचा डान्स प्रेक्षकांना किती आवडला, याचा अंदाज यावरून लावता येतो की, गाण्याला आतापर्यंत ७११ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सपनाची क्रेझ अशी आहे की, कोणतीही डीजे पार्टी तिच्या गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. रेणुका आणि सपनाची गाणी फक्त हरियाणामध्येच नाही, तर देशभरात जोरदार ऐकली जातात. सपना आणि रेणुका या दोघींच्या अभिनयाने आणि गायनाने हरियाणवी चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख दिली आहे. रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ हे गाणे जगभरात हिट झाले. हे गाणे एक अब्जाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

रेणुका आणि सपना चौधरीचे चाहते त्यांच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा जेव्हा दोन्ही कलाकारांचे एखादे गाणे येते, तेव्हा त्याला लाखो व्ह्यूज मिळतात. ‘चटक मटक’ व्यतिरिक्त, ‘रेणुका का कबूतर’, ‘परांदा’, ‘काला दामन’ या गाण्यांनी आजकाल बराच धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!