रेणुका पंवारने ‘बीपी हाय’ गाण्यावर दिले भन्नाट एक्सप्रेशन्स; चाहत्यांनी पाडला लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस


सध्या हिंदी चित्रपट आणि गाण्यांसोबतच प्रादेशिक चित्रपट आणि गाण्यांना देखील सुगीचे दिवस आले आहे. या प्रादेशिक गाण्यांनी त्यांच्या म्युझिक आणि शब्दांनी विशिष्ट भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात या गाण्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. या प्रादेशिक गाण्यांमध्ये भोजपुरी, हरियाणवी, साऊथ आदी भाषेतील गाण्यांचा समावेश होतो.

यातही हरियाणवी गाण्यांनी जरा जास्तच लोकप्रियता मिळवली. लोकप्रिय गायिका रेणुका पंवार तिच्या हरियाणवी गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. रेणुका पवार यांचे प्रत्येक गाणे लोकप्रिय होणार यात शंका नाही. तिच्या प्रत्येक गाण्याच्या प्रदर्शनापूर्वीच ते गाणे प्रसिद्ध होणार याची खात्री सर्वानाच असते. रेणुका आणि तिच्या गाण्यांचे संपूर्ण देशभर फॅन्स पसरलेले आहे. रेणुकाचे नवीन गाणे आले की, ते सोशल मीडियावर व्हायरल होणार हे नक्की.

रेणुका पंवारचे नुकतेच ‘बीपी हाय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील रेणुकाचा अभिनय आणि तिचा आवाज दोघेही प्रेक्षकांना वेड लावताना दिसत आहे. रेणुकाचे गाणे फक्त यूट्यूबवरच हिट होते आणि व्हायरल होते असे नाही, तर सोशल मीडियावरही तिचे गाणे तुफान व्हायरल होत असते. रेणुकाला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. रेणुकाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रेणुकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘बीपी हाय’ गाण्यावर भन्नाट एक्सप्रेशन देत आहे. तिचा हा व्हिडिओ फॅन्सला खूप आवडत असून त्यावर त्यांचे लाईक्स आणि कमेंट्स देखील येत आहेत.

रेणुकाने तिच्या मेहनतीने आणि स्वबळावर हरियाणवी मनोरंजनाच्या दुनियेत नाव कमावले आहे. रेणुकाने ‘५२ गज का दामन’ आणि ‘छन-छन’ या गाण्यांमुळे तुफान लोकप्रियता मिळवली.


Leave A Reply

Your email address will not be published.