अबब! एखाद्या फाईव्ह स्टार हाॅटेलच्या रुमसारख्या आहेत ‘या’ अभिनेत्रींच्या व्हॅनिटी व्हॅन, किंमतही आहे…


बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनय तसेच त्यांच्या जीवनशैलीसाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे आणि ते कसे जगतात, याबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. महागड्या घरांपासून ते ब्रॅंडेड वस्तूंपर्यंत, या कलाकारांकडे सर्वकाही आहे. बॉलिवूड स्टार्समध्ये आणखी एक खास गोष्ट आहे, ज्याला प्रत्येकजण चालतं-फिरतं घर म्हणतात.

व्हॅनिटी व्हॅन हे सिनेतारकांचे दुसरे घर आहे
बॉलिवूड स्टार्स घरांपेक्षा शूटिंग सेटवर जास्त वेळ घालवतात. अशा परिस्थितीत ते सेटवर आपल्या सर्व सुविधांची पूर्ण काळजी घेतात. कलाकारांच्या घरासारख्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅन देखील असतात. ज्यास आपण त्यांचे छोटेसे घर म्हणू शकता. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अशी प्रत्येक सुविधा आहे, ज्यामुळे या कलाकारांना त्यांच्या घराची आठवण जाणवत नाही. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेत्रीही त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनवर कोट्यावधी रुपये खर्च करतात. या यादीमध्ये कोण समाविष्ट आहे ते पाहूया.

आलिया भट्ट
आलिया भट्ट म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री, जिने अल्पावधीतच चित्रपट जगतात एक खास आणि वेगळं स्थान मिळवलंय. आलिया भट्टच्या घराप्रमाणेच तिची व्हॅनिटी व्हॅनही खूप आलिशान आणि आकर्षक आहे. तिच्या व्हॅनिटीमध्ये रंगीबेरंगी दिवेही वापरण्यात आले आहेत. जिथे पिवळ्या आणि निळ्या दिवे दिसतात. तिची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने डिझाइन केली आहे.

तापसी पन्नू
आलिया भट्टप्रमाणेच, तापसीलाही तिच्या व्हॅनिटी व्हॅनशी खास नाते आहे. तिने स्वतःच्या घरासारखी व्हॅनिटी व्हॅन बनवली आहे. या व्हॅनमध्ये तापसीने पांढर्‍या रंगाचे मोठे सोफे ठेवले आहे. त्यासोबत एक लहान बेड आहे, ज्यावर तापसी विश्रांती घेते. तापसीने तिच्या मनाप्रमाणे त्याचं डिझाईन आणि इंटिरियर बनवलं आहे.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा उत्तम अभिनय तर करतेच, त्याचबरोबर ती एक निर्माता देखील आहे. अनुष्काने तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या डिझाईनसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. अनुष्का शर्माच्या व्हॅनिटी व्हॅनचा रंग तिच्या हसण्याइतका उज्ज्वल आहे.

जान्हवी कपूर
जान्हवी कपूरची व्हॅनिटी व्हॅनसुद्धा खूप सुंदर आहे. घराप्रमाणेच तिच्या व्हॅनमध्येही मार्बल लावले आहेत. अभिनेत्रीने अलीकडेच आपला वाढदिवस आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ‘दोस्ताना २’च्या सेटवर साजरा केला होता.

करीना कपूर खान
करीना कपूर खानची व्हॅनिटी व्हॅन चमकदार आहे आणि ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कमी वेळ वाया घालवते. बेबो प्रमाणेच तिची व्हॅनिटी व्हॅनही उत्तम दर्जाची आहे.

कॅटरिना कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला प्रिंट्स आवडतात असे दिसते. तिने आपली व्हॅनिटी व्हॅन ब्लँकेट्स, खुर्च्या, पेंटिंग्जने झाकली आहे. तिची व्हॅनिटी व्हॅन तिच्या घरासारखीच सुंदर आहे.

परिणीती चोप्रा


परिणीती चोप्राची व्हॅनिटी व्हॅन बॉलिवूड कलाकारांच्या मेक-अप रूमसारखी आहे ज्यात प्रत्येक सुविधा उपलब्ध आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.