×

‘आतून मेलीये, श्वास घेता येत नाहीये’, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडची भावूक पोस्ट पाहून पाणावतील डोळे

पंजाबी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा दीप सिद्धू (Deep Sidhu) याचे मंगळवार, १५ फेब्रुवारी रोजी एका रस्ते अपघातात निधन झाले. अशा परिस्थितीत आता दीपच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्लफ्रेंडने पोस्ट सोशल मीडियावर समोर आली आहे. दीपची गर्लफ्रेंड रीना रायने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने एक लांबलचक भावनिक पोस्टही लिहिली आहे. रीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “मी तुटलेली आहे, मी आतून मेली आहे. मला श्वास घेता येत नाही. तुझ्या सोलमेटसाठी परत या. तू मला वचन दिलेस की, तू मला कधीही सोडणार नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करते, माझ्या प्रिय. तू माझ्या हृदयाचे ठोके होतास.”

तिच्या पोस्टमध्ये रीनाने पुढे लिहिले, “मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून असताना, मला आज कळले की तू मला कुजबुजायला आला आहेस. मला माहित आहे की, तू कायम माझ्यासोबत आहेस. आम्ही मिळून आमच्या भविष्याचे प्लॅनिंग करत होतो. आता तू कुठेतरी गायब झाला आहेस. सोलमेट्स एकमेकांना सोडत नाहीत. मी तुला पुन्हा भेटेन, दुसऱ्या बाजूला.” या अतिशय भावूक कॅप्शनसह रीनाने दीपसोबतचे तिचे चार फोटोही शेअर केले आहेत. (Deep Sidhu’s girlfriend emotional post viral on internet)

दीप सिद्धू तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता या चळवळीत खूप सक्रिय होता. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धूही आरोपी होता. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

ही बातमी समोर आल्यापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या अपघातानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दिल्लीहून पंजाबला जाणाऱ्या सिद्धूच्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. त्यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याची गर्लफ्रेंड रीनाही होती. कुंडली-मानेसर-पलवल (KMP) महामार्गावर ट्रकला धडकल्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला, तर रीनाला या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post