एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील इरॉस इंटरनॅशनल ही कंपनी सुप्रसिद्ध होती. या कंपनीने हॉलिवूड कंपनी एसटीएक्ससोबत भागीदारी केली होती. नवीन ब्रँड एसटीएक्स फिल्म्सचा प्रसार करण्याचा पुढाकार अव्वल स्थानावर असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतला आहे. दीपिका या कंपनीच्या एका विनोदी चित्रपटात काम करणार आहे. ज्यामध्ये कॉमेडीचा जन्म पूर्व आणि पश्चिम संस्कृतींच्या मिश्रणातून झाल्याचे म्हटले आहे. दीपिकाने याआधी हॉलिवूडमध्ये विन डिजलसोबत साडेचार वर्षांपूर्वी ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा शेवटचा चित्रपट केला होता. एसटीएक्स फिल्म्ससोबत बनवल्या जाणाऱ्या दीपिकाच्या चित्रपटाची सहनिर्माता असल्याने ती तिच्या नफ्यातही सहभागी होईल.
एसटीएक्स फिल्म्ससह बनावला जात असलेला दीपिकाचा चित्रपट कदाचित हॉलिवूडमधील पुनरागमन म्हटले जात आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या ही कंपनी मुंबईस्थित फिल्म कंपनी इरोस इंटरनॅशनलचा विस्तार आहे. एसटीएक्स फिल्म्स दीपिकाच्या प्रोडक्शन कंपनीशी याविषयी बऱ्याच काळापासून चर्चा करत आहे. आता असे म्हटले जात आहे की, दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. दीपिकाने गेल्या वर्षी ‘छपाक’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, जेएनयूमध्ये आंदोलन करण्यात आले. तिथे विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दीपिका पोहोचल्यानंतर चित्रपटाच्या सामूहिक बहिष्काराचीही घोषणा करण्यात आली होती. (Actress Deepika Padukone teamed up with this Hollywood brand company)
तेव्हापासून दीपिका स्वतःला वादांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अयान मुखर्जींच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तिने तिचा पती रणवीर सिंगच्या ‘८३’ चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त, ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉलिवूड चित्रपट ‘इंटर्न’ चा रिमेकही करणार आहे. त्याचबरोबर ती दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभाससोबत एक चित्रपट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऋतिक रोशन अभिनित दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा ‘फायटर’ या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
एसटीएक्स फिल्म्ससोबतच्या तिच्या नवीन सहभागाबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, “का प्रोडक्शनची स्थापना मनोरंजक सामग्री विकसित आणि निर्मिती करण्याच्या उद्देशाने केली गेली. जी अर्थपूर्ण आहे आणि जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करते. एसटीएक्स फिल्म्स आणि टेम्पल हिल प्रोडक्शन्ससोबत ही भागीदारी केल्याने मला आनंद झाला आहे. दोन्ही कंपन्या का प्रोडक्शनची आकांक्षा आणि सर्जनशील दृष्टीकोन सामायिक करतात. या भागीदारीमुळे, आम्हाला आशा आहे की, आम्ही काही प्रभावी आणि गतिशील आंतरसंस्कृतीक कथा जगासमोर आणू शकू.”
दीपिका पदुकोण फक्त हिंदी चित्रपटांचाच नव्हे, तर भारतीय चित्रपटांचाही अभिनेत्रींच्या दृष्टीने सर्वात मोठा ब्रँड बनली आहे. जागतिक चित्रपटसृष्टीतही तिने आपले नाव कमावले आहे. माध्यामांशी बोलताना दीपिका म्हणाली की, “भारत एक जागतिक शक्ती आहे. ज्या ठिकाणी लोक जोडलेले आहेत, तिथे त्याची छाप दिसते. सिनेमा हे एक बहुआयामी माध्यम आहे. त्याच्या मदतीने जर मी जागतिक परिस्थितीत थोडासा बदल करू शकले, तर माझ्यासारख्या कोणत्याही भारतीयासाठी ही अभिमानाची बाब असेल.”
आता सर्वच चाहत्यांना दीपिकाच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश










