Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड दीपिका पादुकोणला ऑस्कर प्रेजेंटर निवडल्यावर विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले…

दीपिका पादुकोणला ऑस्कर प्रेजेंटर निवडल्यावर विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण १२ मार्च रोजी लॉस अँजेलिसमध्ये होणाऱ्या ९५ व्या ऑस्करमध्ये प्रेजेंटरची भूमिका निभावताना दिसणार आहे. ही बातमी आल्यानंतर तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमधून आणि फॅन्सकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. यातच आता तिला द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या विवेक अग्निहोत्री यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत म्हटले की, “#TheKashmirFiles च्या सोबत अमेरिकेचा प्रवास करताना आणि अमेरिकन लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया मिळताना मी म्हटले होतो की, आता प्रत्येक जण भारतात त्यांची उपस्थिती वाढवण्याची इच्छा ठेवत आहे. भारत हा जगातील सर्वात आकर्षक, सुंदर, सुरक्षित आणि वाढणारा बाजार आहे…हे भारतीय चित्रपटांचे वर्ष आहे…#चांगले दिवस (अच्छे दिन).’’ तत्पूर्वी ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांचे आयोजन १२ मार्चला लॉस अँजेलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

दरम्यान या आधी विवेक यांनी दोनदा दीपिकाची निंदा केली आहे. याआधी त्यांनी दीपिका जेएनयू मध्ये गेल्यामुळे तिला फटकारले होतो. तर आता नुकतेच पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावरून देखील त्यांनी दीपिकावर टीका केली होती.

दीपिका पदुकोणसोबत या प्रेजेंटरच्या यादीत सॅम्युअल एल जॅक्सन, एमिली ब्लंट, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, जेनिफर कोनेली, रिज अहमद, ग्लेन क्लोज, मेलिसा मैक्कार्थी आदी कलाकारांसोबत अजून १६ सेलेब्स देखील असणार आहे. दीपिकाने तिला प्रेजेंटर म्हणून निवडल्याची माहिती देताना इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा