×

Gehraiyaan | दीपिका पदुकोण चित्रपटाबद्दल केले खुलासे; म्हणाली, ‘मी अजिबात सहमत नव्हते…’

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराइयां’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे जेवढे प्रशंसक आहेत, तेवढेच लोक शकुन बत्राच्या चित्रपटातील आलिशाच्या व्यक्तिरेखेवर टीका करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

सध्या ‘गहराइयां’ चित्रपटाचा रिव्ह्यू खूप सकारात्मक आला आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ज्यानंतर अलिशा सर्वांच्याच जिभेवर आहे. सध्या दीपिकाने एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असे अनेक मोठे खुलासे केले आहेत, जे आलिशाचे पात्र समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत. (deepika padukone made a big disclosure about gehraiyan said i did not agree)

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पदुकोणने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटात आलिशा तिच्या चुलत बहिणीच्या मंगेतरसोबत दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील आलिशाच्या अनेक मतांशी ती सहमत नव्हती, पण तिला ती व्यक्तिरेखा चांगली करायची होती. तिला तिच्या भुमिकेवर कोणताही अन्याय करायचा नव्हता. आलिशाच्या पात्राशी बरेच लोक सहमत असतील, तर अनेकांना दोष सापडले असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की अशी पात्रे अस्तित्वात नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

या चित्रपटात आलिशा म्हणजेच दीपिका ही टियाची (अनन्या पांडे) चुलत बहीण असते. जी नंतर टियाच्या मंगेतराला आवडू लागते. त्याचबरोबर हळूहळू चित्रपटाच्या शेवटपर्यंत अनेक खुलासे होत जातात. दीपिकाने काही काळापूर्वी ‘गहराइयां’चे  काही फोटो शेअर करून चाहत्यांचे आभारही मानले होते.

हेही वाचा :

Latest Post