अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान रामची भूमिका साकारताना दिसला आहे. तर अभिनेत्री कृती सेनाॅन सीतेच्या भूमिकेत झळकली आहे. सैफ अली खान रावणची भूमिका साकारताना दिसत आहेत. तसेच या चित्रपटात काही मराठी कलाकार काम करतामा दिसले आहेत. या चित्रपटात हनुमानजीची भूमिका अभिनेता देवदत्त नागे यांनी साकारली होती.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाला सर्व क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. एवढंच नाही तर, चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप ट्रोल करत आहेत. अभिनेता देवदत्त नागे एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच संतापले आहेत. देवदत्त नागेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
व्हिडीओ पोस्ट करताना देवदत्त नागेने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिळालेल्या अपार प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत!…’ देवदत्त नागेच्या या पोस्टवर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यावर कमेंट करताना एकाने लिहिले की,‘जय मल्हारमधील तुझं काम छान होतं पण, आदिपुरुषमध्ये डायलॉग तुला पटले का?’ असा प्रश्न चाहत्यांनी देवदत्त नागेला विचारला आहे. दुसऱ्याने लिहिले की, ‘हिंदू धर्माची बदनामी केली तुम्ही नागे जी…’, इतर नेटकरी म्हणाले की, ‘थोडी तरी लाज वाटू द्या… बजरंगबली तुम्हाला माफ करणार नाहीत…’
View this post on Instagram
ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या संवादांपासून ते व्हिज्युअलपर्यंत सोशल मीडियावर जोरदार टिकेची झोड उडाली आहे. इतकंच नाही, तर चित्रपटातील पात्रांच्या पेहराव आणि स्टाईलवरूनही त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशात एकापाठोपाठ एका कारणामुळे हा चित्रपट नव्याने वादात सापडताना दिसत आहे.
अधिक वाचा-
–‘रावण वाईट होता… पण वेल्डर नव्हता’, आदिपुरुषचा हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, नक्की पाहा
–‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले मुकेश खन्ना; प्रभासच्या अभिनायावरही केली जाेरदार टिका