Monday, July 13, 2026
Home बॉलीवूड समय रैनासोबतचा कुशा कपिलांचा बनावट AI फोटो व्हायरल, जुन्या वादाला पुन्हा उधान

समय रैनासोबतचा कुशा कपिलांचा बनावट AI फोटो व्हायरल, जुन्या वादाला पुन्हा उधान

कुशा कपिला हि एक अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर आहे. आणि समय रैना हा एक कॉमेडियन स्टार आहे. तर यांच्या दोघांत 2024 च्या अखेरीस वाद झाला होता. या वादाचे कारण म्हणजे समयने एका कॅामेडी शो दरम्यान आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांनतर त्याच्यातील मैत्री संपली, मात्र त्याचा एक एकत्र सेल्फी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा त्याची मैत्री जुळली का? असे चाहत्याचे प्रतिक्रिया येत आहेत. मात्र आता कुशा कपिलाने या बाबत माहिती दिली आहे.

कुशा कपिलाने म्हटली आहे की, हा व्हायरल फोटो एआय-निर्मित’ आहे. तिने ही माहिती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत केली आहे. आणि या स्टोरी मध्ये सांगितले आहे की, हा एक बनावट फोटो आहे असे म्हटले आहे. आणि पुर्वनियोजित करुन फोटो तयार केली आहे. यातील माझा हा चेहरा एआय वापरुन तयार करण्यात आलाय, अन् ती पुढे म्हणली मी मला समजत नाही पैसे खर्च करुन का कोणी हे असले काम करत आहे. हे मला बदनामी करण्यासाठी केले जात आहे. पण हे खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.

कुशा (kusha)कपिला तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिली आहे, चला या सर्व गोष्टींमागील सत्य एक-एक करून शोधू या, कारण त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी प्लॅन करायला माझ्याकडे वेळ नाही. मात्र आपण हे शांतपणे, हुशारीने करू. मला काही भांडन नाही करायचे, तर यातुन असे समजते ‘इन्सेल’ इंटरनेट संस्कृती महिलांना कमी लेखण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे दाखवते. मात्र या वर काहीतरी अॅक्शन घेतील पाहिजे.

कुशा कपिला आणि समय रैनाच्या व्हायरल फोटो मध्ये समय एका लाल रंगाचा टॉप घातलेल्या महिलेच्या बाजुला उभा दिसत आहे. आणि तिचा चेहरा एडिट करुन कपिला सारखा दाखवण्यात आला आहे. मात्र वास्तव पाहता त्याच्यातील मैत्रीही  2024 च्या वादनंतरच संपली होती.

गरोदरपणातील आव्हानांवर दीपिका पादुकोणने शेअर केला व्हिडिओ, बाथरूमपर्यंत जाणंही झालं कठीण

हे देखील वाचा