×

धर्मवीर सिनेमातील गुरुपौर्णिमा गाणे प्रदर्शित, गाण्याच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंचा लूक आला समोर

सध्या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी बायोपिक हा एक उत्तम आणि लोकांच्या आवडीचा असा पर्याय उपलब्ध झाला आहे. हिंदी, मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनेक दिग्गज लोकांवर विविध बायोपिक तयार होताना आपण बघत आहोत. या बायोपिकच्या यादीत आता मराठीमधील अजून एका चित्रपटाचे नाव जोडले जाणार आहे. सध्या मराठीमध्ये एक सिनेमा तुफान गाजताना दिसत आहे, आणि तो सिनेमा म्हणजे ‘धर्मवीर’. दिवंगत राजकीय नेते असलेल्या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाने मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बज निर्माण केला आहे.

आनंद दिघे हे सामान्य लोकांमध्ये ‘जनसामान्यांचा नेता नाही तर, जनसामान्यांचा आधार’ अशी त्यांची ओळख होती. सामान्य माणसाचा अतिशय असामान्य आणि रंजनक प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ठाण्याच्या लोकांसाठी दैवत असणाऱ्या आनंद दिघे यांनी त्यांच्या कामाच्या बळावर तुफान लोकप्रियता मिळवली. बाळासाहेब ठाकरे दैवत असणाऱ्या आनंद दिघे यांनी बाळासाहेबांच्या विचारावर आयुष्यभर मार्गक्रमण केले. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे.

आता या सिनेमातील पहिले ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यातून आनंद दिघे यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल असणाऱ्या नितांत आदराचे दर्शन होताना दिसते. बाळासाहेबांना आपले सर्वस्व मानणारे आनंद दिघे या गाण्यात बाळासाहेबा ठाकरे यांचे पाद्यपूजन करताना दिसत आहे. गाण्याची सुरुवात प्रसाद ओकच्या संवादाने होते, तो म्हणतो की, “गुरुपुर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा सण आहे.” गाण्यात प्रसाद ओक साहेबांच्या भेटीला जातो आणि तिथे त्यांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करतो.

‘भेटला विठ्ठल’ असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करणारा अभिनेता देखील समोर आला आहे. सिनेमात मकरंद पाध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे. या गाण्यातून मकरंदचा बाळासाहेबांच्या रूपातील लूक देखील समोर आला आहे. आनंद दिघे बाळासाहेबांना आपला गुरु मानत होते. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन आनंद दिघे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य फक्त सामान्य लोकांसाठी वेचले. कोणत्याही बँकेत अकाऊंट नसलेल्या आणि नेहमीच खिसे रिकामे असणाऱ्या आनंद दिघे यांनी त्यांचे घर सोडून सामान्य माणसांसाठी स्वतःचे संपूर्ण जीवन खर्च केले. विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post