व्हिडिओ: राहुल वैद्यने ‘खतरों के खिलाडी ११’च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये लढवला रोहित शेट्टीसोबत पंजा


टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शनिवार आणि रविवार राज्य असते ते फक्त रियॅलिटी शो चे. टीव्हीवर एक संपला की एक रियॅलिटी शो सुरुच असतात. कदाचित असे कोणतेही चॅनेल नाही ज्यावर रियॅलिटी शो लागत नाही. मात्र, या सर्व रियॅलिटी शो पेक्षा प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता लागलीय ती ‘खतरों के खिलाडी’ या शोची. या शोमध्ये दिसणारे वेगवेगळे स्टंट्स करताना दिसणारे कलाकार आणि या शोला चार चाँद लावणारे रोहित शेट्टीचे सूत्रसंचालन नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. या शोची घोषणा झाली की, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

‘खतरों के खिलाडी ११’ हा शो लवकरच सुरू होणार आहे. या शोची संपूर्ण शूटिंग पूर्ण झाली असून, १७ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शो चा लाँचिंग सोहळा मुंबईमध्ये संपन्न झाला. यावेळी सर्व स्पर्धकांसह रोहित शेट्टी देखील उपस्थित होता. यावेळी सर्व स्पर्धकांची ओळख देखील करून देण्यात आली. (Director Rohit Shetty Upcoming Show Khatron Ke Khiladi Season 11 Organized Launching Party)

या कार्यक्रमादरम्यान राहुल वैद्यने रोहित शेट्टीसोबत पंजा लढवताना फोटोग्राफर्सला पोज दिली. यावेळी राहुल त्याचा संपूर्ण जोर लावत होता. मात्र, रोहित जराही त्याच्या जागेवरून हालला नाही. या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला गेला. सोशल मीडियावर या सोहळ्याचे संपूर्ण व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. हा शो नेहमी टीआरपीच्या रेसमध्ये टॉपवर असतो. यावर्षी या शो चे ११ वे पर्व सुरू होणार आहे.

आता या नवीन पर्वात काय- काय बदल केले आहेत, कोणते- कोणते नवीन स्टंट स्पर्धकांना कार्याला मिळणार आहे यासाठी सर्वानाच खूप उत्सुकता आहे. यावेळेस या शोची टॅगलाईन आहे, ‘डर वर्सेज डेयर.’ हा शो अमेरिकन शो फायर फॅक्टरवरून प्रेरित आहे. मागील सात पर्वांपासून रोहित या शोसोबत जोडला गेला असून त्याने या शोच्या पाच पर्वांमधे सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे.

या पर्वात अनुष्का सेन, राहुल वैद्य, वरुण सूद, विशाल आदित्य सिंग, सना मकबुल, सौरभ राज जैन, आस्था गिल, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, श्वेता तिवारी स्टंट करताना दिसणार आहेत.

यासोबतच एका वृत्तानुसार राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंग, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी आणि अर्जुन बिजलानी हे ‘खतरों के खिलाडी ११’ च्या महाअंतिम फेरीत पोहोचले असून त्यांच्यात महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’


Leave A Reply

Your email address will not be published.