Thursday, April 18, 2024

टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार ‘ज्ञानेश्वर’ ते ‘ज्ञानेश्वर माउली’पर्यंतचा प्रवास, उलगडणार जुना इतिहास

टेलिव्हिजनवर आजकाल अनेक पौराणिक कथांवर मालिका बनत आहेत. आपला महाराष्ट्र हा संत परंपरेने समृद्ध आहे. अनेक संतांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या कार्याचा सुगंध आजही सर्वत्र दरवळत आहे. याच संतांची ओळख नवीन पिढीला व्हावी. त्यांचे कार्य सगळ्यांना समजावे यासाठी टेलिव्हिजनवर अनेक मालिका प्रसारित होत असतात. अशातच ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवर एका नव्या मालिकेतून दाखवला जाणार आहे.

‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवीकोरी मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउली यांची जीवनकथा दाखवली जाणार आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी जगाला पसायदान देणाऱ्या या महानपुरुषाने समाधी घेतली होती. अंगावर लोकांनी अक्षरशः शेणाचे गोळे टाकले, पण त्यांनी त्यांच्यातील चांगुलपणा कधी सोडला नाही. रेड्याच्या तोंडून वेद बोलून घेतले, निर्जीव भिंतीला चालवले. अशा या सामान्य पुरुषाची असामान्य ताकद पाहायला मिळणार आहे. (Dnyaneshwar mauli serial will release on Sony Marathi)

पाच भावंडांचा सांभाळ करत त्यांनी झोपडीत दिवस काढले. घरोघरी भिक्षा मागत पोटाची खळगी भरली. याच महापुरुषांची गाथा आता आपल्याला दररोज पाहायला मिळणार आहे. मालिका २७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेचं शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते या मालिकेचे निर्मातेही आहेत. बेला शेंडे आणि अवधूत गांधी- आळंदीकर यांनी मालिकेचे शीर्षकगीत गायले आहे आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी या शीर्षकगीताला संगीत दिले आहे. हे सुमधुर शीर्षकगीत ऐकताना माउलींच्या दर्शनाची अनुभूती होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा