जेंडेयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! बनली दोनदा ‘हा’ पुरस्कार जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला

0
62
Zendaya
Photo Courtesy: Twitter/dela_bydesign

जागतिक पुरस्कारांमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे एमी पुरस्कार होय. हा पुरस्कार आपल्या शिरपेचात रोवण्यासाठी कलाकार अतोनात कष्ट घेतात. नुकताच 74वा एमी अवॉर्ड्स 2022 अमेरिकेमध्ये पार पडला. यादरम्यान अनेक हॉलिवूड कलाकार रेड कार्पेटवर आपला ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक दाखविताना दिसले. यानंतर विजेत्यांची नावे घाेषित करण्यात आली. हा पुरस्कार साेहळा साेमवारी रात्री 8 वाजेपासून सुरू करण्यात आला हाेता. ज्यानुसार भारतात मंगळवारी (दि. 13 सप्टेंबर) सकाळी पुरस्कार साेहळा सुरू झाला. चला तर मग जाणून घेऊया विजेत्यांची नावे…

ड्रामा सीरिजमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी दोन वेळा एमी पुरस्कार जिंकणारी जेंडेया (Zendaya) ही पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली आहे. 2020 मध्ये, ती ड्रामा सीरिज यूफोरियासाठी मुख्य अभिनेत्रीचा एमी पुरस्कार पटकावणारी सर्वात तरुण विजेती ठरली. यूफोरियामधील मुख्य भूमिकेसाठी तिला पुन्हा हा पुरस्कार मिळाला आहे.

एमी अवॉर्ड्स 2022 विजेत्यांची यादी
बेस्ट एक्ट्रेस ड्रामा सीरिज- जेंडेया (यूफोरिया)
आऊटस्टॅंडिंग ड्रामा सीरिज- सक्सेशन
डायरेक्टिंग फॉर ड्रामा सीरिज- ह्वांग डॉन्ग ह्युक (स्क्विड गेम, रेड लाइट, ग्रीन लाइट)
रायटिंग फॉर कॉमेडी सीरिज- क्विंटा ब्रूसन (एब्बॉट एलिमेंट्री, पायलट)
लीड ऍक्टर- कॉमेडी सीरिज- जेसन सुडेकिस (टेड लस्सो)
लीड ऍक्ट्रेस लिमिटिड सीरिज या टीव्ही मूव्ही- अमांडा सेफ्राइड (द ड्रॉप आउट)
सपोर्टिंग एक्ट्रेस लिमिटिड सीरिज/ टीव्ही मूव्ही- जेनिफर कूलिज ( द व्हाइट लोटस)
व्हरायटी टॉक सीरिज- लास्ट वीक टुनाइट विद जॉन ओलीवर
व्हरायटी स्केच सीरिज- सॅटरडे नाईट लाइव्ह
सपोर्टिंग ऍक्टर इन कॉमेडी सीरिज- ब्रेट गोल्डस्टीन (टेड लास्सो)
सपोर्टिंग ऍक्टर कॉमेडी सीरिज- शर्लिन ली राल्फ (अब्बॉट एलिमेंट्री)
सपोर्टिंग ऍक्टर इन ड्रामा सीरिज- जूलिया गार्नर (ओजार्क)
सपोर्टिंग ऍक्टर इन ड्रामा सीरिज- मॅथ्यू मॅकफॅडियन (सक्सेसन)
सपोर्टिंग ऍक्टर इन लिमिटिड सीरिज/ टीव्ही मूव्ही- मरे बार्टलेट ( द व्हाइट लोटस)
लीड ऍक्टर इन लिमिटिड सीरीज/ टीव्ही मूव्ही- मायकल कीटन (डोपसिक)
आऊटस्टँडिंग डॉक्यूमेंट्री ऑर नॉन फिक्शन सीरीज- द बीटल्स गेट बैक

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध गायकाच्या हातात हात टाकून चालताना दिसली शहनाज; चाहता म्हणाला, ‘सिद्धार्थला परत आणा’
‘मिस वर्ल्ड’ बनण्यापूर्वी ‘या’ जाहिरातीने रातोरात प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या, व्हिडिओ वेधतोय लक्ष
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here