Monday, July 15, 2024

तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे, हरियाणवी क्वीन सपना चौधरी, वडिलांच्या निधनानंतर कमावले मेहनतीने नाव

सपना चौधरी ही हरियाणाची खूप प्रसिद्ध डान्सर आहे. आपल्या मेहनतीवर, चिकाटीवर तिने प्रसिद्धी मिळवली आहे. सपना चौधरी आता कोट्यावधीची मालकीण आहे. तिची लाईफस्टाईल, लक्झरी कार, राहणीमान याबद्दल आज जाणून घेऊ.

सपना चौधरी (sapna choudhary) आता आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानाला आहे. ती एक डान्सर म्हणून आणि गायिका म्हणून खूप प्रसिद्ध झाली आहे. तिने मनोरंजन क्षेत्रात स्वतःच वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर, कष्टाने तिने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या मेहनतीने आज ती करोडोची मालकीण झाली आहे.

सपना १२ वर्षाची असतानाच तिचे बाबा वारले त्यानंतर आख्या परिवाराचे ओझे तिच्यावर होतं. खूप मेहनत करून कष्ट करून तिने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. सपना तिच्या हरीयाणवी लटक्या- झटक्यासाठी खूप प्रसिद्धी आहे. सपना चौधरीची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. सपना देशविदेशात आपल्या गाण्यामुळे आणि डान्समुळे खूप प्रसिद्ध आहे. सपना आपल्या अवघड प्रवासानंतर आज श्रीमंतीत जगत आहे.  स्वतः ती कोट्यावधीची मालकीण आहे, लक्झरी कार, आलिशान बंगला अशी लाईफस्टाईल सध्या जगत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नुसार एका स्टेज परफॉर्मन्सचे ते २० ते ३० लाख रुपये घेते. तिचे वार्षिक उत्पन्न साधारण पन्नास कोटी आहे. तिला गाड्यांचे देखील वेड आहे तिच्याकडे ऑडी क्यू सेवन, फोर्ड, बीएमडब्ल्यू सेवन अशा महागड्या गाड्या आहेत. दिल्लीमध्ये स्वतःचा तिचा आलिशान बंगला आहे. हे सर्व तिने स्वतःच्या कमाईवर ती मेहनतीवर स्वतः मिळवलेले आहे. हा तिचा प्रवास वाखाडण्याजोगा आहे.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा