Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड बिकिनीतील फोटो शेअर करून ईशा गुप्ताने लावली सोशल मीडियावर आग, कमनीय बांधा पाहून चाहते घायाळ

बिकिनीतील फोटो शेअर करून ईशा गुप्ताने लावली सोशल मीडियावर आग, कमनीय बांधा पाहून चाहते घायाळ

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री कार्यरत आहे. ज्या त्यांच्या अभिनयासोबतच, बोल्ड आणि मादक अदांसाठी देखील ओळखल्या जातात. चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या हेतूने अनेक स्त्रिया या सृष्टीत येतात. मात्र सर्वांनाच अमाप यश मिळते असे नाही. अनेक महिलांमधून मोजक्याच महिला ह्या सुपरस्टार होतात, काही अभिनेत्री बनूनच राहतात तर काही थोड्या काळातच इंडस्ट्रीतून बाहेर पडतात. यासर्वांमधे अशा पण काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तुफान लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता.

‘जन्नत २’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या जरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग असून, ती सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा नेहमीच तिचं सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे फोटो, व्हिडिओ, स्टेटस अपडेट करत असते. तिचे सोशल मीडिया अकौन्टपाहिले तर त्यात तिचे बिकिनी आणि बोल्ड फोटोस आपल्याला भरपूर पाहायला मिळतील.

ईशा नेहमीच तिच्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता पुन्हा तिने तिचा एक थ्रोबॅक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बहुरंगी रंगाची एक अतिशय मादक बिकी घातली असून, या फोटोमध्ये तिने तिचा कमनीय बांधा फ़्लॉन्ट केला आहे. तिच्या प्रिंटेड बिकिनी लूकमध्ये तिने सर्वांचे तिच्या मादक बांध्याने आणि आकर्षक अंदाजने लक्ष वेधून घेतले आहे.

ईशा तिच्या फिटनेसच्या बाबतीतही खूप सजग आहे. ती नेहमीच योगा करत असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. कधी पाण्याखाली जाऊन योगाच्या पोज देते तर, कधी बीचवर ईशा अनेक अवघड आसनं अगदी सहज करते. सोशल मीडियावर तिचे हे व्हिडिओ आणि फोटो आपल्याला दिसतील.

‘जन्नत २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये आलेल्या ईशाने टोटल धमाल, रुस्तम, कमांडो २, हमशक्ल्स, बाद्शाहो आदी अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा