शॉक लगा, शॉक लगा..!! फक्त ‘हीच’ नाही बॉलिवूडमधील पाच अभिनेत्री लग्नाअगोदर होत्या गरोदर

बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा सेलिब्रिटी प्रेमविवाह करतात. त्यातील काही लग्नानंतर एकमेकांच्या जवळ येतात तर काही आधीच जवळ आलेले असतात म्हणून लग्न करतात.


‘गोलमाल है भाई सब गोलमाल है।’ बॉलिवूडचं हे प्रसिद्ध गाणं आपण ऐकलं असेलच नाही का? १९७९ मध्ये आलेला अमोल पालेकर स्टारर गोलमाल हा सिनेमा आणि यातलं हे गाणं तुफान चाललं. जे आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

खरं तर या सिनेमाचा आणि या लेखाचा काडीमात्र देखील संबंध नाही परंतु हा या गाण्याचा या ओळींचा आणि या लेखाचा तसं पाहायला गेलो तर बराच संबंध आहे. कारण जी गोष्ट आपण आता वाचणार आहात त्या परिस्थितीला हे गाणं तंतोतंत लागू पडतं.

बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा सेलिब्रिटी प्रेमविवाह करतात. त्यातील काही लग्नानंतर एकमेकांच्या जवळ येतात तर काही आधीच जवळ आलेले असतात म्हणून लग्न करतात. लग्नानंतर काही काळातच लगेच आपल्याला याचे परिणाम म्हणून अभिनेत्री गरोदर असल्याचं कळतं. याची उदाहरणच आपल्याला सांगणार आहे. चला तर मग बघुयात कोणत्या आहेत या जोड्या!

नेहा कक्कर – रोहनप्रीत सिंह

मुळात हा लेख लिहिण्याला कारणीभूत हे दोघे ठरले. याचवर्षी २४ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह यांनी लग्न केलं. यानंतर लगेच ते दुबईला हनिमूनसाठी गेले होते. तसे फोटोच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले होते.

Neha With Husband
Neha With Husband

या दोघांच्या लग्नाला दोन महिने सुद्धा पूर्ण होत नाहीत तर नेहाने ती गरोदर असल्याचं माध्यमांना सांगितलं आणि सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्काच दिला. आता आपल्याला देखील ठाऊक आहे की, गरोदरपणा कन्फर्म होण्यासाठी किमान कालावधी किती लागतो ते!

नेहा धुपिया – अंगद बेदी

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी मे २०१८ मध्ये आनन-फानन येथे मोठ्या थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर लगेच जुलैमध्ये गरोदर असल्याची बातमी स्वतः माध्यमांना दिली. यानंतर लगेच नोव्हेंबर २०१८ मध्ये कन्या मेहेर हिला जन्म दिला आणि आई झाली. यावरून सर्वांना कळालं की नेहा ही लग्नाआधीच गरोदर राहिली होती.

Neha Dhupiya
Neha Dhupiya

श्री देवी – बोनी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील एक अशी अभिनेत्री आहे जी लग्नाआधीच गर्भवती झाली होती. श्रीदेवी बोनी कपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. १९९६ मध्ये दोघांनी लग्न केले आणि काही महिन्यांनंतर श्रीदेवीने जान्हवी कपूरला जन्म दिला. श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या द्वितीय पत्नी होत्या.

नीना गुप्ता

नीना गुप्ता वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंधात होती. हे दोघे इतके जवळ आले की नीना या विव यांच्यापासून गरोदर राहिल्या होत्या. नीना यांचं लग्न व्हिव्हियन यांच्याशी झालंच नाही परंतु असं असूनही त्यांनी कुमारी माता होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला.

Nina Gupta
Nina Gupta

नीना यांनी पुढे कधीच लग्न केलं नाही आणि एकट्याने खंबीरपणे कन्या मसाबाचा सांभाळ केला. आज मसाबा स्वतंत्र फॅशन डिझायनर आहे.

सारिका – कमल हसन

हे दाक्षिणात्य कलाकार जोडपं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालं होतं. इतकं की लग्नाआधीच सारिका या गर्भवती राहिल्या. १९८६ साली त्यांनी कन्या श्रुती हिला जन्म दिला. श्रुतीच्या जन्मानंतर तब्बल दोन वर्षांनी कमल हसन यांनी सारिका यांच्याशी लग्न केलं आणि आज हे तिघेही खूप सुखात राहत आहेत.

sarika Hasan
sarika Hasan

कोंकणा सेन शर्मा – रणवीर शौरी

अभिनेत्री कोंकणाने २००७ मध्ये रणवीर शौरी याला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सप्टेंबर २०१० मध्ये लग्न केले आणि त्यानंतर फक्त सहा महिन्यांनंतर कोंकणाने मुलगा हारूनला जन्म दिला ज्यामुळे हे स्पष्ट झालं की लग्नाआधीपासूनच ती गर्भवती होती.


Leave A Reply

Your email address will not be published.