Thursday, March 28, 2024

‘मूंछें हों तो नत्थू लाल जैसी…’ म्हणत बॉलीवूडला वेड लावणाऱ्या अभिनेत्याने पुढे ‘या’ कारणाने सोडला अभिनय

चाळीसच्या दशकातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन मुकरी, ज्यांनी 500हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकरीवर लिहिलेला एक डायलॉग, ‘मूंछें हों तो नत्थू लाल जैसी हों’ आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. मुकरी यांचे खरे नाव मोहम्मद उमर मुकरी आहे आणि त्यांचा जन्म 5 जानेवारी 1922 रोजी महाराष्ट्रात झाला.

मुकरी यांच्या चित्रपटातील ‘नत्थूलाल’ आणि ‘तैयबअली’ ही नावे लोकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. कॉमेडियन कलाकार मुकरीची चित्रपट क्षेत्रात पदार्पणाची कहाणी म्हणावी तेवढी रंजक नव्हती.  खरं पाहाता  मुकरी आणि दिग्गज अभिनेता दिलीप कुमार एकाच वर्गात शिकत होते. तसेच या दोघांनाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

काही काळानंतर दिलीपकुमार यांच्या संघर्षाच्या काळात त्यांची भेट देविका राणीशी झाली. असे म्हटले जाते की दिलीप साहेबांना पाहून देविका राणी त्यांच्यावर इतकी प्रभावित झाली की तिने त्यांना ‘ज्वारभाटा’ चित्रपटातून लॉन्च केले,. हा चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर एका वर्षानंतर दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून देविका राणीने 1945च्या ‘प्रतिमा’ या चित्रपटात मुकरीला एका भूमिकेची ऑफर दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, यानंतर दिलीप साहेबांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात मुकरीची भूमिका ठरलेलीच असायची. मुकरीने आपल्या काळातील सर्व मोठ्या नायकांबरोबर काम केल आहेे. त्यानंतर 1994मध्ये त्यांनी पत्नीची ढासळलेली प्रकृती पाहता स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केले आणि आपल्या पत्नीच्या सेवेत पूर्णपणे व्यस्त झाले. तसेच, मुकरी यांचे 4 सप्टेंबर 2000 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हे देखील वाचा