Friday, December 8, 2023

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी संशयास्पद मृत्यू, घरात सापडला मृतदेह

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्याने चाहते अस्वस्थ झाले आहेत. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर काल रात्री तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. ती 31वर्षींची आहे. अपर्णाचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आला.

अपर्णाचा मृतदेह गुरूवारी आढळला आहे. रात्री 7च्या सुमारास तिचा मृतदेह आढळला. त्या ठिकाणी तिची आई आणि बहिण तिथे उपस्थित होत्या. तिच्या अचानक झालेला मृत्यमुळे सगळेच हैराण झाले आहेत. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अपर्णाच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली आहे.

अपर्णाने अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अपर्णाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने “मुधुगव”, “मिथिली वेंडम वरुणू”, “आचायंस”, “नीरंजना पुक्कल”, “देवस्पर्शम” यासह बऱ्याच मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘चंदनामाझा’ आणि ‘आत्मसाखी’ यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठीही अपर्णा खूप प्रसिद्ध होती.

अपर्णा सोशल मीडियावर देखील सक्रिय असायची. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असायची. तिने निधनाच्या आगोदर तिच्या धकट्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो देखील चांगलाच चर्चेत आला आहे. अपर्णाच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Famous Malayalam TV industry famous actress Aparna Nair has been found dead at home)

अधिक वाचा-
‘कहानी घर घर की’मधून करिअरची सुरुवात, ‘या’ शोने बदलले आमिर अली मलिकचे आयुष्य
गणेशोत्सवाच्या ‘त्या’ नियमावर वैभव मांगलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले…

हे देखील वाचा