प्रसिद्ध गायक मिका सिंगने आपल्या आवाजाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. मिका सिंगच्या गाण्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मिका सिंग त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. मात्र यावेळी मिका सिंग चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. मिका सिंग बाबत वाईट बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मिका सिंग आजारी असल्याच्या बातम्या समोर येत आहे. इतकच नाही तर आजारपणामुळे त्याचे आर्थिक नुकसानही झाल्याचे बोलले जात आहे.
मिका सिंगच्या (Mika Singh ) घशाला इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे मिका सिंग परदेशात आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या बातम्यांवर अखेर मिका सिंगने मौन तोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिका सिंग देशात विदेशात म्युझिक टूर करत होता. सलग गाणे गायल्यामुळे मिका सिंगची तब्येत खालावल्याचे स्वतः मिका सिंगने सांगितले आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच मिका सिंगला त्याचा कार्यक्रम रद्द करावा लागल्याचा प्रसंग मिका सिंगने माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.
यावेळी बोलताना मिका सिंग म्हणाला की, “आपल्या शरीराला अजिबात आराम न दिल्यामुळे तब्येत बिघडली आहे. घशाला इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे मी परदेशात आहे. याचा परिणाम खूप मोठा झाला आहे. शो रद्द केला पण त्यामुळे तब्बल 15 कोटींचे नुकसान झाले. ”
अमेरिकेत गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर मिका सिंगचे अचानक डोके दुखायला लागले. यावेळी डॉक्टरांकडे गेल्यानंतर अमेरिकेतील डॉक्टरांनी त्याला गाणे गाण्यास नकार दिला. अमेरिका ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास करून आलेला मिका सिंग यावेळी गाणे गाऊ शकला नाही. यादरम्यान सध्या मिका सिंगची तब्येत सुधारली आहे. तसेच तो लवकरच लाईव्ह शो साठी एकदम फिट होईल असेही बोलले जात आहे. (Famous singer Mika Singh’s health deteriorated )
अधिक वाचा-
–आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर ‘हा’ सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट; वाचा विजेत्यांची यादी
–मंगळागौरीसाठी जुई गडकरीचा खास मराठमोळा लुक, पाहा फोटो