Monday, October 2, 2023

जिगरी मित्राच्या वाढदिवशी मिका सिंगने खर्च केले तब्बल 4 कोटी, गिफ्टमध्ये काय काय दिलंय पाहाच

मैत्रीची उदाहरणं देणारी अनेक कलाकार मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंग याने त्याच्या मित्रासाठी असे काही केले आहे, ज्यामुळे प्रत्येकजण म्हणत आहे की, “मित्र असावा तर मिका सिंगसारखा.” होय, नुकतेच मिकाने आपल्या मित्राच्या वाढदिवशी त्याला असे गिफ्ट दिले आहे, जे पाहून कोणाच्याही भुवया उंचावतील. खरं तर, मिका सिंगचा खास मित्र कंवलजीत सिंग याने नुकताच वाढदिवस साजरा केला होता. मित्राच्या वाढदिवशी मिकाने त्याला भेट म्हणून मुंबई आणि दिल्लीत कोट्यवधी रुपयांचे दोन बंगले दिले आहेत. ही बातमी समोर येताच, मिका सिंगवर कौतुकाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

खास मित्राला दिले महागडे गिफ्ट
असे वृत्त समोर येत आहे की, गायक मिका सिंग (Mika Singh) याने जिगरी मित्र कंवलजीत सिंग (Kanwaljeet Singh) याच्या वाढदिवशी त्याला मुंबई आणि दिल्ली येथे 4 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट गिफ्ट केले आहेत. या बातमीनंतर नेटकरी मिकाचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणत आहेत की, मिका अनोळखी व्यक्तींपासून ते आपल्या मित्रांपर्यंत सर्वांसाठी काहीही करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. तसेच, तो दिलेला शब्द पाळण्यासाठीही ओळखला जातो.

आधीही दिलंय महागडं गिफ्ट
यापूर्वीही मैत्रीचे उदाहरण बनलेल्या मिकाने आपल्या मित्राला मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. या गाडीची किंमत 80 लाख रुपये होती. आता पुन्हा एकदा लक्झरी गिफ्ट देऊन मिकाने जगाला दाखवून दिले आहे की, त्याची मैत्री सर्वात वेगळी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मिकाची संपत्ती आहे तरी किती?
माध्यमांतील वृत्तांनुसार, मिका सिंग एकूण 97 कोटी रुपयांचा मालक आहे. मिका जगभरातील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणी गाऊन बक्कळ पैसा कमावतो. तो टीव्हीवर रिऍलिटी शोमधूनही चांगला पैसा कमावतो. मिका एका गाण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो. त्याचे एकट्याचे अल्बमही सुपरहिट ठरतात. तसेच, तो पार्टी, लग्न आणि स्टेज शोसाठी 30 ते 50 लाख रुपये मानधन घेतो. (singer mika singh gifted his bestfriend two beautiful flats on his birthday worth rs 4 crore)

महत्त्वाच्या बातम्या-
शाही आयुष्य जगायची बॉलिवूडची ‘ही’ खलनायिका, बनली होती Rolls Royce खरेदी करणारी पहिली अभिनेत्री
बॉलिवूडच्या नणंद-भावजयने सोशल मीडियावर पोस्ट करून मागितलं काम, करण जोहरची कमेंट वेधतेय लक्ष

हे देखील वाचा