हे पण झाले! यशच्या एका फॅनने चक्क त्याचा केजीएफ २ सिनेमातील आयकॉनिक संवाद छापला चक्क लग्नपत्रिकेवर

“हिंसा, हिंसा, हिंसा … मुझे यह पसंद नहीं है। मैं इससे बचता हूं! लेकिन … हिंसा मुझे पसंद करती है, मैं इससे बच नहीं सकता!” या संवादावरून सर्वांनाच समजले असेल की, हा कोणत्या सिनेमातील संवाद आहे.केजीएफ चॅप्टर २ सिनेमातील यशचा हा आयकॉनिक संवाद माहित नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांची तोंडी आपण हा डायलॉग ऐकला असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला या डायलॉगशी संबंधित एक वेगळीच गोष्ट सांगणार आहोत. चित्रपटात कलाकारांच्या तोंडी असलेले संवाद नेहमीच प्रेक्षकांच्या तोंडी आपण ऐकतो. काही संवादांमुळे देखील चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळताना आपण पाहिली आहे. कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांच्यात एक वेगळेच नाते असते. आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करणारे फॅन्स काय काय करतील याचा अंदाज न लावला तरच चांगले. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या केजीएफ २ सिनेमाबद्दलच घ्या. या सिनेमात अभिनेता यशाच्या तोंडी असलेल्या त्याच्या आयकॉनिक संवादावर आधारित चक्क लग्नाची पत्रिका आली आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या केजीएफ चॅप्टर २ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्या झाल्या धमाका केला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार कमाई करणाऱ्या या सिनेमाने खूपच लोकप्रियता मिळवली. यशला या सिनेमाने एवढी लोकप्रियता मिळवून दिली की त्याचे नाव आणि केजीएफ सिनेमा एक ब्रँड बनला आहे. कदाचित यासाठीच यशच्या एका चाहत्याने चक्क त्याच्या आवडत्या रॉकी भाईचा ‘हिंसा’ संवाद एका हटके स्टाईलने लग्नाच्या पत्रिकेवर लिहिला असून, सध्या ही लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे.

१४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमाईचे एक नवीन रेकॉर्ड तयार केले. १३ मेला कर्नाटकच्या बेळगावमध्ये राहणाऱ्या श्वेताचे चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न होणार आहे. याच नवरदेवाने आपल्या लग्नाच्या पत्रिकेत ‘केजीएफ चॅप्टर २’ सिनेमातील अतिशय गाजत असणारा संवाद अतिशय युनिक स्टाईलने लिहिला असून, सध्या सोशल मीडियावर या पत्रिकेचा चांगलाच बोलबाला दिसून येत आहे. चंद्रशेखरने सिनेमातील ‘हिंसा’ या संवादाला बदलत पत्रिकेत लिहिले आहे की, “लग्न, लग्न, लग्न मला आवडत नाही, मी नेहमीच तालात असतो, मात्र माझ्या नातेवाइकांना लग्न आवडते, त्यासाठी मी टाळू शकत नाही.” आता हा संवाद अशा अजब स्टाईलने लिहिल्यामुळे ही पत्रिका आणि हा नवरदेव सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रिकेवर अनेकांनी त्यांची मते मांडत पत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीची क्रेटिव्हिटीला सलाम केला आहे.

हे असे पहिल्यांदा नाही झाले की कोणत्या सिनेमाच्या संवादांना नेटकऱ्यांनी किंवा प्रेक्षकांनी असे रिक्रिएट केले आहे. याआधी देखील प्रदर्शित झालेल्या पुष्पा सिनेमातील “पुष्पा, पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला” हा गाजलेला संवाद एकाने त्याच्या बोर्डाच्या परीक्षेत “पुष्पा राज… अपुन लिखेगा नहीं…”। असा लिहिला होता. तेव्हा देखील हा पेपर खूपच व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-