दुखापतीनंतरही ‘फ्री हिट दणका’ चित्रपटाचे शुटींग केले पुर्ण, ‘फॅन्ड्री’ फेम अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा


नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेला लोकप्रिय चित्रपट ‘फॅन्ड्री’ (Fandry) आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेले जब्या आणि शालूचे पात्र तुम्हाला आठवतच असेल. जब्याने आपल्या जबरदस्त आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली. आता हा आपला जब्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

‘फॅन्ड्री’ चित्रपटात जब्याची भूमिका साकारणारा अभिनेता सोमनाथ अवघडे (Somnath Awaghade) याला या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्याला जब्या नावाने चाहते ओळखू लागले. मात्र, हा जब्या ‘फॅन्ड्री’ चित्रपटानंतर कुठेतरी हरवून गेला. तो नंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. मात्र आता तो पुन्हा एकदा त्याची दमदार कामगिरी दाखवण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटातून येत आहे. (fandry fame actor somnath awaghade upcoming movie free hit danka)

या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असून, सोमनाथने या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत. चित्रपटाच्या शुटिंगवेळी सोमनाथला दुखापत झाली असूनही, त्याने चित्रपटाचे शुटींग पुर्ण केले. ही एक आश्चर्यकारक बाब आहे. क्रिकेट खेळ खेळणे ही काही साधारण गोष्ट नाही. चित्रपटाच्या शुटींगसाठी सोमनाथ क्रिकेट शिकत होता. मात्र शिकत असतानाच त्याला दुखापत झाली. हा किस्सा त्याने स्वत: शेअर केला आहे.

‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असून, हा खेळ बारकाव्याने खेळला जावा यासाठी सोमनाथने पुरेपूर मेहनत घेतली आहे. त्याचवेळी त्याला ही दुखापत झाली आहे. या चित्रपटात सोमनाथ अवघडे व्यतिरिक्त आणखी कलाकार आहेत. ज्यात ‘सैराट’ चित्रपटात लंगड्या पात्राची भूमिका साकारणारा तान्हाजी मालगुंड आणि सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख दिसणार आहेत. हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!