‘काय रे जब्या, जिच्यासाठी तू काळी चिमणी…’, शालूच्या डान्स व्हिडिओवर युजरची भन्नाट कमेंट होतेय व्हायरल


राजेश्वरी खरात एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात शालू आणि जब्याची प्रेमकथा जब्बर गाजली. जब्या बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

खरंतर जब्याची निरागस शालू खूपच बदलली आहे. राजेश्वरी आता बोल्ड झालीये. असे आम्ही नाही तर राजेश्वरीचे चाहते म्हणत आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओवर अशा आशयाची कमेंट आली आहे, जिने अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे.

वास्तविक राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती जबरदस्त अंदाजात नाचताना दिसत आहे. जांभळ्या रंगाच्या टॉपवर शॉर्ट्स घातलेल्या शालूच्या स्टेप्स आणि हावभाव सगळं अगदी पाहण्यासारखं आहे. यात ती ‘वन डान्स’ या इंग्रजी गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे.

हा डान्स व्हिडिओ शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ज्या गोष्टी शब्द बोलू शकत नाहीत, ते आपले शरीर बोलते.” भन्नाट डान्सवर आता चाहतेही भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “लय भारी करतेय तू डान्स.” दुसरा म्हणतोय, “एकच नंबर शालू.” तर एका युजरने कमेंट करत लिहिले, “काय रे जब्या, जिच्यासाठी तू काळी चिमणी पकडत होतास, तिच आहे का रे ही?” मजेदार अंदाजात केलेली ही कमेंट देखील व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ढोल कुणाचा वाजं जी…!’ गाण्याचा तालावर झोका घेताना दिसली अनुष्का सरकटे; ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओला चाहत्यांची पसंती

-‘पुन्हा अभिनेत्रीसोबच डान्स केला तर धुलाई करेन…’ अंशुमन विचारेच्या लाडकीने दिली त्याला धमकी

-‘जलपरी’ बनून सारा अली खानने मारली होती समुद्रात उडी; व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहाच


Leave A Reply

Your email address will not be published.