Saturday, May 23, 2026
Home अन्य बाफ्टा अवॉर्ड्स 2024 च्या रेडकार्पेटवर दीपिकाच्या प्रेग्नेंसीची रंगली चर्चा

बाफ्टा अवॉर्ड्स 2024 च्या रेडकार्पेटवर दीपिकाच्या प्रेग्नेंसीची रंगली चर्चा

सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणला जाणारा ‘बाफ्टा २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर हा सोहळा भारतीयांसाठी खास ठरला. कारण या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण अवतरली होती. तिने देसी लुक परिधान करत सर्वांचे मन जिंकले. मात्र, सिनेसृष्टीत तिच्या या लुकची चर्चा नव्हे तर प्रेग्नेंसीची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने (deepika padukone) प्रतिष्ठित बाफ्टा अवॉर्ड्स सोहळ्यात बॉलिवूड ग्लॅमरचा जलवा दाखवला. इंस्टाग्राम स्टोरीजवर दीपिकाने तिच्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली. दीपिकाने सोनेरी आणि चांदीच्या छटा असलेली चमकदार साडी परिधान केली होती, ज्याच्यावर सर्वत्र सिक्वीन्स वर्क होते. तिने या लुकने उपस्थितांवर मोहिनी घातली. तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होत असतानाच तिच्या प्रेग्नेंसीचीही चर्चा पाहायला मिळाली.

सोहळ्या दरम्यान अनेकदा दीपिका आपल्या पदराने पोट झाकताना दिसली. तिच्या या हावभावामुळे सिनेसृष्टीत दीपिका बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘मला असे वाटते की दीपिका प्रेग्नंट आहे, तिचा बेबी बंप दिसत आहे आणि तिच्या हातांचा आकारही बरेच काही सांगून जातो.’ युजरच्या या कमेंटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नुकतचं इन्स्टाग्रामवर दीपिकाने तिच्या स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याला तिने “कृतज्ञता” असे कॅप्शन दिले आहे. 77 वा बाफ्टा चित्रपट पुरस्कार सोहळा लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये दिमाखात साजरा झाला. रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा रंगला होता. भारतात, हा पुरस्कार सोहळा लायन्सगेट प्लेवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

उपस्थितांमध्ये ‘सॉल्टबर्न’ स्टार बॅरी केओघन, ‘मेस्ट्रो’ अभिनेते ब्रॅडली कूपर आणि कॅरी मुलिगन, ‘ओपेनहाइमर’ लीड सिलियन मर्फी आणि दिग्दर्शक ग्रेटा गेर्विग, क्रिस्टोफर नोलन, सेलीन सॉन्ग आणि योर्गोस लॅन्थिमोस यांचा समावेश होता.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका अलीकडेच हृतिक रोशनसह ‘फायटर’ या चित्रपटात दिसली होती. या एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात तिच्यासह चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दाक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे आणि ९ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मृत्यूची खोटी बातमी देणारी पोस्ट डिलीट करून पूनम पांडेने दिले नवे अपडेट, लोकांनी केला संताप व्यक्त
जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटल्यावर बिग बी झाले भावूक म्हणाले, ‘हे नसेल तर काही नाही’

हे देखील वाचा