शेतकऱ्यांनी अडवली अभिनेता अजय देवगणची गाडी, काहीही न बोलता अजयने जोडले हात


संपूर्ण देशभरात शेतकरी आंदोलनवरून बरीच चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण आंदोलनाबाबत आपले मत व्यक्त करत आहे. अशातच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अजय देवगणने एक ट्विट केले आहे. त्याने असे म्हटले की, ” भारत आणि भारतातील निती नियमांच्या विरोधात तयार केलेल्या या खोट्या गोष्टींना भाळू नका.”

अजयच्या या ट्विटनंतर देशातील सगळे शेतकरी तसेच आंदोलक समर्थक त्याच्यावर खूपच नाराज झालेत. यातच मंगळवारी गोरेगावमध्ये एका शेतकरी समर्थकणाने अजयची गाडी मध्येच थांबवली आणि तो शेतकऱ्यांना सपोर्ट करत नाही असा आरोप केला.

दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ही गोष्ट साफ दिसत आहे की, अजय देवगण गाडीमध्ये बसला आहे आणि बाहेरून एक शेतकरी समर्थक गाडी थांबवून बोलत होता की, “तू पंजाबच्या विरोधात आहेस. जरा लाजू वाटू दे तुला.”

यावर अजय काहीही प्रतिक्रिया न देता गाडीतून फक्त शेतकऱ्यांसमोर हात जोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. माधम्यांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने अजयची गाडी थांबली होती, ती व्यक्ती नंतर फिल्म सिटीकडे जाताना दिसली. तेव्हा या गोष्टीची कल्पना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिथे जाऊन त्या व्यक्तीला बाहेर काढले.

शेतकरी आंदोलनला घेऊन अनेक सेलेंब्स त्याच्या सोबत आहेत तर काही शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आहेत. शेतकरी आंदोलनला 3 महिने होऊन गेलेत. कृषी कायदे आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गोष्टी जुळून येत नाहीये. सरकार आपली पाऊले मागे घेत नाहीयेत. तिथे शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की ,त्यांना त्यांचे हक्क पाहिजे आहेत. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार शेतकऱ्यांचे समर्थन करत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.