Saturday, April 20, 2024

‘आदिपुरुष’ चित्रपटावर लागला बॅन; इलाहाबाद न्यालयात नोंदवली तक्रार…

अभिनेता प्रभास याचा नवीन चित्रपट ‘आदिपुरुष‘ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाचा विरोध वाढतच आहे. यामध्ये चित्रपट कमी कार्टुन जास्त वाटत आहे असे म्हणून चित्रपटाचा पार कचरा करुन टाकला होता. काहींनी तर या चित्रपटाची व्हिडिओ गेमशी तुलना केली होता, तर काही लोकांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय असे म्हणले आहे. आता पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यासाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर (दि. 2 ऑक्टोंबर) दिवशी आयोध्यामध्ये प्रदर्शित केला होता. यानंतर अनेक लोकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. एवढेच काय तर ‘आदिपुरुष’ चित्रपटावर राजकारणी लोकांनीही टीका केली होती. आता पुन्हा एकदा निर्माता ओम राउत (Om Raut) याच्यासाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक परिसरात आदिपुरुष चित्रपटाचे कलाकार आणि निर्मातावर एफआईआर नोंदवली असून इलाहाबाद हायकोर्टाचाही दरवजा वाजवला आहे. इलाहाबाद हायकोर्टच्या लखनऊ खंडपिठात तक्रार नोंदवली आहे. तक्रारकर्ता कुलदीप तिवारी यांच्यातर्फे वकील रंजना अग्निहोत्रीने नुकतंच प्रदर्शित झालेल्या आदिपुरष टीझरवर आक्षेप घेतला आहे.

केंद्र सरकार तर्फे वकील अश्वीनी सिंग हिने सांगितले की, तक्रार करणाऱ्या व्यक्तीने या मुद्द्यमध्ये केंद्र, राज्य, सेंसर बोर्ड, चित्रपट दिग्दर्शक ओम राउत, अभिनेता प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनन आणि अनेकांना फसवले आहे. पुढील सुनावणीची तारीख अजून ठरलेली नाही. महिन्याच्या सुरुवातीला, चित्रपटाच्या टीझरमध्ये हिंदू धर्माच्या देवतांना अयोग्य ईणि टुकीच्या रीतीने चित्रित केले आहे. असा आरोप करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी तक्रार दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून नेटकरींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दररोज कोणत्या कोणत्या कारणावरुन चित्रपटाला ट्रोल करण्यात येत आहे. आता थेट न्यालायामध्ये तक्रार नोंदवल्यामुळे चित्रपट स्थगित होण्याची शक्यता आहे. आता कोर्टाचा न्याय कोणाच्या बाजूने असेल हे पाहणे खूपच महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! रितेश अन् जिनिलिया अडचणीत? भाजपने लावला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप
रणबीर अन् आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर, जाणून घ्या तारीख

हे देखील वाचा