‘अवतार’चा विश्वविक्रम! ‘या’ चित्रपटाला मागे सारत बनला जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

film avatar is the world highest grossing film avengers endgame jurassic world titanic also on record?


हॉलीवूड असो वा बॉलिवूड, सिने जगात चित्रपट सर्वत्र बनवले जातात. त्याचवेळी, प्रत्येक चित्रपटाने चांगली कमाई करणे हे अपेक्षित असते. परंतु यात असे काही मोजके चित्रपट असतात, जे जागतिक पातळीवर रेकॉर्डतोड कमाई करतात. तसेच, ऐतिहासिक विक्रम रचतात. असाच काहीसा प्रकार हॉलिवूड चित्रपट ‘अवतार’च्या बाबत घडला आहे. हा चित्रपट चीनमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला आहे.

‘अवतार’ चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये, सुमारे 20 हजार 368 कोटी म्हणजेच 2.802 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. यासह, अवतारने 20 हजार 332 कोटी म्हणजे 2.797 अब्ज डॉलर्सची कमाई करणाऱ्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’लाही मागे सोडले आहे.

साल 2015 मध्ये दिग्दर्शक जॉस व्हेडन दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स’ने बॉक्स ऑफिसवर 9699.14 कोटी रुपये कमवले होते. तसेच, सर्वाधिक कमाई करणारा हा सहावा चित्रपट ठरला होता. या मल्टीस्टारर चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतातही चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

सन 2015 मध्ये ‘जुरासिक वर्ल्ड’ने 10837.46 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक कॉलिन ट्रेवरो होते. जुरासिक वर्ल्ड हे डायनेसोर्सने केलेल्या विध्वंसांवर आधारित होते. चित्रपट सर्व मोठ्या थिएटरमध्ये दाखवला गेला होता.

‘स्टार वॉर्स – द फोर्स अवेकन्स’ 2015 मध्ये रिलीज झाला होता. जेजे अबराम्स याचे दिग्दर्शक होते. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 13368. 37 कोटी इतके होते. या सायन्स फिक्शन चित्रपटाने जगभरात सुमारे 13 हजार 336 कोटींचा व्यवसाय केला होता.

एकेकाळी जगभरात कौतूक झालेल्या ‘टायटॅनिक’ला कोण विसरू शकेल? सन 1997 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित होता. ज्यामध्ये टायटॅनिक नावाचे एक मोठे जहाज पाण्यात कसे बुडाले हे दाखवण्यात आले होते. जहाजात उपस्थित लोक त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु ते स्वतःला बुडण्यापासून वाचवू शकत नाहीत. जीवन आणि मृत्यूच्या या संघर्षादरम्यानही यात एक प्रेमकथा दाखवली गेली. ‘अवतार’ आणि ‘अ‍ॅव्हेंजर एंडगेम’च्या आधी हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याने 14147.11 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रम नोंदविला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.