Sunday, January 26, 2025
Home बॉलीवूड बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमातील पाहिले गाणे ‘नाचो नाचो’ रिलीझ, रामचरण अन् एनटीआरचा डान्स ठरतोय लक्षवेधी

बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमातील पाहिले गाणे ‘नाचो नाचो’ रिलीझ, रामचरण अन् एनटीआरचा डान्स ठरतोय लक्षवेधी

बाहुबली’ फेम दिग्दर्शक एसएस राजामौली आणखी एक बिग बजेट चित्रपट घेऊन येत आहेत. सध्या राजामौली त्यांच्या आगामी सिनेमा ‘आरआरआर’मुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ‘आरआरआर’चे पहिले गाणे ‘नाचो नाचो’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण जोरदार नाचताना दिसत आहेत. हे गाणे प्रदर्शित होताच यूट्यूबवर कव्हर झाले आहे.

हे गाणे प्रदर्शित होताच लोकप्रिय झाले आहे. आकर्षक बीट्स, हाय ऑन एनर्जी हे गाणे चाहत्यांना नाचायला भाग पाडते. ‘नाचो नाचो’ हे गाणे विशाल मिश्रा, राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे. हे गाणे प्रेम रक्षित यांनी कोरिओग्राफ केले आहे. हे गाणे ट्विटरवर शेअर करताना राम चरणने लिहिले की, तो ‘नाचो नाचो’च्या सामूहिक तालावर नाचल्याशिवाय राहू शकत नाही. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यातील डान्सची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. दोन सुपरस्टार एकाच पडद्यावर पाहायला मिळणे ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानी आहे.

चित्रपटातील या गाण्याने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘आरआरआर’ची कथा १९२० च्या कालखंडावर आधारित आहे. यात स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांची कथा दाखवण्यात आली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. राजामौलींच्या या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, ऑलिव्हिया मॉरिस महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहून चित्रपटाची भव्यता स्पष्ट होते.

बाहुबलीनंतर राजामौली ‘आरआरआर’सोबत परतत आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असून त्याची एकूण किंमत ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. बाहुबलीने देश-विदेशात भरपूर कमाई केली होती. चाहत्यांना ‘आरआरआर’कडून खूप आशा आहेत. ‘आरआरआर’ अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाहुबलीचा विक्रम मोडीत काढू शकतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा