Wednesday, February 21, 2024

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, महिलांमध्ये आलियाने मारली बाजी

गुजरातमधील गांधीनगर येथे 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. दोन दिवसीय उत्सव 27 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला. रविवारी मुख्य श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रणबीर कपूरला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला महिला वर्गात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.

आलिया भट्टला (Alia Bhatt) हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आलियाला स्टेजवर हा पुरस्कार दिला. शबाना आझमी यांना ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी महिला वर्गात सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यात शबाना आझमी अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्याचप्रमाणे आलिया भट्ट देखील खूप सुंदर दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Ankita Lokhande | निराश मनाने बिग बॉसच्या सेटबाहेर पडली अंकिता लोखंडे, मुलाखत देण्यास देखील दिला स्पष्ट नकार
ऍनिमल चित्रपटात ‘अबरार’ करणाऱ्या बाॅबी देओलला झाला होता भयानक अपघात, अजुनही आहे पायात राॅड

हे देखील वाचा