Monday, June 17, 2024

काळीज तोडणारी बातमी! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने केली आत्महत्या, घरामध्ये स्वत:ला घेतले पेटवून

बॉलिवूडमधून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. चित्रपट निर्माता संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी श्रृष्ठी गुप्ताने आत्महत्या केली आहे. दोघींनीही आपल्याच घरात स्वत: ला पेटवून घेऊन जीव दिला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलेे की, अंधेरीमध्ये ५५ वर्षीय एका महिलेने आपल्या मुलीसह घरात आग लावून कथितरीत्या आत्महत्या केली आहे. तपास केल्यानंतर समजले की, महिला आणि मुलगी चित्रपट निर्माता संतोष गुप्ता यांची पत्नी आणि मुलगी आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि श्रृष्ठीने सोमवारी दुपारी आपल्या डी. एन. नगर अंधेरी येथील आपल्या घरात स्वत:ला पेटवून घेतले होते. प्रकरण तेव्हा समजले, जेव्हा शेजारच्यांना या गोष्टीची माहिती झाली आणि त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. त्यानंतर लवकरच दोघींनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर अस्मिताला पहिल्यांदा मृत घोषित करण्यात आले, तर मुलगी ७० टक्के पेटली होती. तिला ऐरोली नेशन बर्न्स सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे मंगळवारी तिनेही शेवटचा श्वास घेतला.

वृत्तानुसार, अस्मिता एका गंभीर आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे ती खूप चिंतेत होती आणि कंटाळून तिने आपले आयुष्य संपवले. दुसरीकडे मुलीला आपल्या आईची चिंता बघवली नाही आणि तिनेही आपले आयुष्य संपवले. वृत्तानुसार, अस्मिता दीर्घ काळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे कंटाळून तिने स्वत:ला आग लावली. त्यानंतर मुलीनेही आपल्या आईसोबत जीव दिला.

डी. एन. नगरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी भरत गायकवाड यांनी सांगितले की, “या प्रकरणात दुर्घटनेत झालेल्या अपघातात दोन वेगवेगळे रिपोर्ट दाखल केले आहेत. बाकी प्रकरणाचा तपास होत आहे.”

संतोष गुप्ता यांनी आतापर्यंत ‘फरार’, ‘आज की औरत’ आणि ‘रोमी द हिरो’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

हे देखील वाचा