Friday, April 19, 2024

प्रतीक्षा संपली! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटाचा टीझर रिलीज, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘वेड‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (दि. 24 डिंसेबर)ला रिलीज झाला आहे. रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन ‘वेड’चा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रितेश दिग्दर्शनासोबतच अभिनयही करत आहे. ‘वेड’ या चित्रपटात जेनेलिया डिसूजा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.

हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने त्याच्या ‘वेड’ चित्रपटाविषयी माहिती दिली होती. तसेच, त्याने चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. रितेश देशमुखने ‘वेड’ चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘वेड’ या चित्रपटाची कथा अपूर्ण प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सांगत आहे की, “प्रेम मिळते तेव्हा आनंद मिळतो, पण प्रेम अपूर्ण राहिल्यावर एकटेपणा मिळतो”. टीझर रिलीज झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटात जेनेलिया डिसूजा एका साध्या लूकमध्ये दिसत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा (Jenifer D’souza) 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

या चित्रपटाची घोषणा करताना अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिने आपला आनंद व्यक्त केला. तिने ट्विट करत सांगितले की, “माझा जन्म महाराष्ट्रात झाला. अभिनयाला सुरुवात केल्यानंतर मी हिंदी, तमिळ, तेलगू अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. तिथल्या प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. आता मी रितेश दिग्दर्शित मराठी चित्रपटातून पदार्पण करत आहे.”

वेड या चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ , विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर महत्वाची भूमिका साकारत आहेत. (Actor ritesh deshmukh first directorial film ved teaser out know tha release date)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेते विक्रम गोखलेंबाबत मोठी बातमी! ‘लवकरच व्हेंटिलेटर काढणार, ते डोळेही उघडतायेत’, वाचा काय म्हटलेत डॉक्टर…

राखी सावंतबद्दल प्रश्न विचारताच संतापला मिका सिंग, थेट पत्रकाराला केली शिवीगाळ

हे देखील वाचा