लग्नानंतर सिद्धार्थ अन् मिताली प्रथमच ‘हौस हजबंड’साठी आले एकत्र; चाहत्यांकडूनही मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद


अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारं जोडपं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जातात. शिवाय ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं रेशीमगाठीत अडकलं आहे. हे दोघे नेहमी एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांच्यामधील मजेदार आणि रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना भावते.

नुकतेच हे जोडपे लग्नानंतर पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. ‘स्टोरीटेल मराठी’ या प्रसिद्ध ऑडिओबुकने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे जोडपं एकत्र आलं आहे.

‘हौस हजबंड’ असं या ऑडिओसिरीजचं नाव आहे. यात सिद्धार्थ आणि मितालीच्या आवाजात रोहित आणि रेवाची कहाणी सांगण्यात आली आहे. रोहित आणि रेवा…आताच लग्न झालेलं, एकमेकांच्या प्रेमात असलेलं कपल. पण त्यांच्या नवरा बायकोच्या कन्सेप्ट जरा उलट्यापालट्याच आहेत. मात्र आजूबाजूची जालीम दुनिया त्यांना हवं तसं जगू देत नाही. सगळे मिळून या दोघांना सॉलिड सासुरवास करतायेत. अशावेळी या दोघांची टीम सॉलिड राहू शकेल का? की ही जालीम दुनिया त्यांच्यात फूट पाडेल? या कपलच्या लव्हस्टोरीचं पुढं काय होत? हिच रोमँटिक यूथफुल स्टोरी म्हणजे ‘हौस हजबंड’ होय. (first time after marriage siddharth chandekar and mitali mayekar came together project)

या अनोख्या आणि रंजक स्टोरीचं लेखन युवा लेखिका गौरी पटवर्धन यांनी केलं आहे. ‘स्टोरीटेल मराठी’च्या आधीच्या दोन ऑडिओ सिरीजप्रमाणे ही सिरीज देखील साहित्यप्रेमींकडून प्रचंड पसंत केली जात आहे. सिद्धार्थ आणि मितालीने आजवर अनेक चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता त्यांच्या आवाजातील या ऑडिओ सिरीजलाही चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने सोडले मौन; सोशल मीडियाचा आधार घेत म्हणाली…

-बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर; बोल्डनेस पाहून चक्रावले नेटकरी

-बॉलिवूडमधील सख्ख्या बहिणी आता ऑनस्क्रीन दिसणार एकत्र? करिश्मा कपूरने फोटो शेअर करून दिली झलक


Leave A Reply

Your email address will not be published.