बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर; बोल्डनेस पाहून चक्रावले नेटकरी


‘बिग बॉस ८’ ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत ही अत्यंत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आहे. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांकडून देखील तिच्या फोटोंना वाहवा मिळत असते. अशातच सोनालीचे काही फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रेक्षक सातत्याने या फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

सोनाली राऊतने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनाली काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिने या फोटोमध्ये बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याआधी देखील तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर चर्चेत आले आहेत. पण या फोटोने प्रेक्षकांचे खास लक्ष वेधून घेतले आहे.

सोनाली ही अत्यंत टॅलेंटड अभिनेत्री आहे. ती वयाच्या १९ व्या वर्षी किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली होती. त्यानंतर ‘बिग बॉस ८’ नंतर देखील ती खूप चर्चेत आली होती. या शोमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार सर्वांनीच पाहिला होता. पण या शोमध्ये तिचा राग सगळ्या प्रेक्षकांना तेव्हा दिसला, जेव्हा तिने अली कुली मिर्झाला कानशिलात मारली होती. अलीने तिच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्यावर तिला राग अनावर झाला आणि तिने हे कृत्य केले होते. (Bigg Boss fame actress sonali raut’s bold photo viral on social media)

सोनाली राऊत ही २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द एक्सपोज’ या चित्रपटात हिमेश रेशमियासोबत दिसली होती. यामध्ये ती मुख्य भूमिकेत होती. तसेच ती मागच्या वर्षी ‘डेंजरस’ या वेबसीरिजमध्ये बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरसोबत दिसली होती. विक्रम भट्ट यांनी ही वेबसीरिज लिहिली होती.

सोनाली राऊत ही सुपर मॉडेल उज्ज्वला राऊत हिची बहिण आहे. तसेच तिचे वडील एक डेप्युटी कमिश्नर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.