बॉलिवूडमधील सख्ख्या बहिणी आता ऑनस्क्रीन दिसणार एकत्र? करिश्मा कपूरने फोटो शेअर करून दिली झलक


बॉलिवूडमधील कपूर घराणे हे एक नावाजलेले घराणे आहे. त्यांच्या अनेक नियम, अटी होत्या. यातील एक नियम म्हणजे त्यांच्या घराण्यातील मुली कधीही चित्रपटात काम करणार नाहीत. पण रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांच्या दोन मुलींनी केवळ त्यांच्या घराण्याचा हा नियम मोडला नाही, तर चित्रपटसृष्टीमध्ये येऊन त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु बॉलिवूडमधील या दोन मोठ्या अभिनेत्री आणि सख्या बहिणी आजपर्यंत कधीच चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत. पण ऍड फिल्ममध्ये त्या दोघी अनेकवेळा एकत्र दिसल्या आहेत.

आता करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. करिश्मा कपूरने गुरुवारी (२२जुलै) तिच्या बहिणीसोबत एक फोटो शेअर करून झलक दाखवली आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “बेबोसोबत शूटिंग करणं नेहमीच खास असतं, काहीतरी रोमांचक लवकरच येत आहे.” करीनाने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करिश्मा कपूर आणि दिग्दर्शक पूनित मल्होत्रासोबत एक फोटो शेअर केला आहे.

करीना कपूरने स्टोरीला फोटो शेअर करून लिहिले आहे की, “बहिणीसोबत शूटिंग करणं नेहमीच बेस्ट असतं.” करिश्मा कपूरने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तसेच करीना कपूरला देखील इंडस्ट्रीमध्ये येऊन २० पेक्षाही जास्त वर्ष झाले आहेत. त्या दोघींनी त्यांच्या चित्रपटात काम करून त्यांच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. आता त्या दोघींना एकत्र ऑनस्क्रीन बघण्याचे प्रेक्षकांचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, हे येणारा काळचं सांगेल. (Kareena Kapoor and karishma kapoor are shooting togather, photo viral on social media)

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, करीना कपूर ही आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. करिश्मा कपूर ही मागच्या वर्षी ‘मेंटलहूड’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमध्ये तिने मिरा शर्मा हे पात्र निभावले होते. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.