राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने सोडले मौन; सोशल मीडियाचा आधार घेत म्हणाली…


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपखाली अटक केल्यामुळे, तो मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी (१९जुलै ) अटक केले आहे. पतीला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदा तिचे मौन सोडले आहे. यासाठी तिने सोशल मीडियाचा वापर केला आहे. तिने तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी एका पुस्तकाचा फोटो शेअर करून सांगितले आहे की, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी ती तयार आहे.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियापासून लांब गेली होती. परंतु गुरुवारी (२२जुलै) रात्री तिने एका पुस्तकाची दोन पानं इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहेत. याच्या सुरुवातीला अमेरिकन ऑथर जेम्स थर्बर याचा एक कोट आहे. ज्यात लिहिले आहे की, “रागामध्ये मागे वळून बघू नका किंवा घाबरून पुढचे बघू नका, तर सावधानपणे चहूबाजूला पाहा.”

पुस्तकात पुढे लिहिले आहे की, “आपण रागात भूतकाळात वळून बघतो आणि त्या लोकांची आठवण काढतो ज्यांनी आपल्याला दुःख दिले आहे. जी निराशा आपण झेलली आहे ती आपल्याला दुर्भाग्याने मिळालेली असते. आपण प्रत्येक शक्यतेचा विचार करतो की, कदाचित आपली नोकरी जाऊ शकते, आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्या जवळच्या कोणत्या तरी व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होऊ शकते. परंतु आपल्याला ज्या जागी थांबण्याची गरज आहे ती जागा हीच आहे. आता काय आहे आणि काय होऊ शकते. आपण त्याला उत्सुकतेने पाहू शकत नाही, पण आपण सावधपणे सगळं पाहू शकतो.” (Shilpa Shetty’s first post after husband Raj Kundra’s arrest in pronographic case)

पुस्तकात पुढे लिहिले आहे की, “मी किती भाग्यशाली आहे की, मी या जगात जिवंत आहे, हे आठवून मी एक दीर्घ श्वास घेते. मी भूतकाळात अनेक संकटांचा सामना केला आणि भविष्यातील संकटापासून वाचू शकते, पण यासाठी माझा आजचा दिवस खराब करण्याची काही गरज नाहीये.”

शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवरून ही गोष्ट स्पष्ट होत आहे की, भविष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी ती तयार आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर याचा परिणाम शिल्पा शेट्टीवर देखील झाला आहे. तिला ‘इंडियाज सुपर डान्सर’ या शो मधून बाहेर काढले आहे. ती या शोमध्ये परीक्षक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.