भारीच ना! ‘वाथी कमिंग’ गाण्यावर ‘थाला’ धोनीचा पत्नी साक्षीसह भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ

Former Cricketer MS Dhoni Wife Sakshi Dhoni Dance Video Viral On Social Media


भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आपल्याला सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असलेला दिसत नाही. असे असले तरीही त्याची पत्नी साक्षी धोनी मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती आपले नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. अशाच प्रकारे आता तिने स्वत:चा आणि धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होत आहे. या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

एका इंस्टाग्राम युजरने त्यांच्या हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी आणि साक्षी टॉलिवूड सुपरस्टार थालापती विजयच्या ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघेही आनंदात दिसत आहेत. हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. काही तासातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

चाहत्यांकडून मिळतंय प्रेम
साक्षी सिंग धोनीने यादरम्यान गुलाबी रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिने नेकपीसही घातला आहे. तिचे केस मोकळे आहेत आणि ती डान्स करताना आपल्या केसांना हलवत आहे. दुसरीकडे धोनीही साक्षीच्या खांद्यावर हात ठेवून ठुमके लावत आहे. यादरम्यान धोनीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि टाय घातली आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट करून या जोडप्याला प्रेम देत आहेत.

इतर गाण्यांवरही केला डान्स
याव्यतिरिक्त या जोडप्याने अनेक सुंदर गाण्यांवर डान्स केला. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. धोनी आणि साक्षीचा हा व्हिडिओ तिच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीचा आहे. हे दोघेही नुकतेच आपल्या मित्राच्या पार्टीमध्ये गेले होते.

साक्षीनेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.