Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड रजनीकांत ते पवन कल्याण, ‘या’ 7 सुपरस्टार्सने लपवली खरी ओळख! प्रसिद्धीसाठी बदलले आपले नाव, पाहा यादी

रजनीकांत ते पवन कल्याण, ‘या’ 7 सुपरस्टार्सने लपवली खरी ओळख! प्रसिद्धीसाठी बदलले आपले नाव, पाहा यादी

आज सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांना आपण त्यांच्या नावाने ओळखतो. मात्र, तुम्हाला माहितीये का, याच कलाकारांनी सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वी आपली नावे बदलली होती. साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी त्यांचे खरे नाव बदलले आणि नवीन स्टेज नाव मिळवले. या कलाकारांनी वेगवेगळ्या कारणांनी आपली नावे बदलली. काहींनी अंकशास्त्रामुळे आपले नाव बदलले, तर काहींनी ट्रेंड फॉलो केला. आपण रजनीकांत, मामूट्टी यांच्यापासून ते यश आणि धनुषपर्यंत रुपेरी पडद्यासाठी नाव बदलणाऱ्या 7 कलाकारांबद्दल जाणून घेऊयात…

1. रजनीकांत
‘थलायवा’ म्हणून प्रसिद्ध असलेले रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड होते. मात्र, त्यांनी के. बालाचंदर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अपूर्वी रागंगल (1975) सिनेमापासून सुरुवात करण्यापूर्वी आपले नाव बदलले होते. खरं तर, शिवाजीराव गायकवाड यांना रजनीकांत नाव देणारी महान व्यक्ती बालाचंदर होती. बालाचंदर यांनी सहाय्यक अभिनेता शिवाजी गणेशन याच्या नावाशी घोळ व्हायला नको म्हणून रजनीकांत यांना स्टेज नाव दिले होते.

2. मामूट्टी
मामूट्टी (Mammootty) यांचा जन्म मुहम्मद कुट्टी पानापराम्बिल इस्माइल नावाने झाला होता. मात्र, मल्याळम सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी त्यांचे नाव बदलून मामूट्टी ठेवले. कथितरीत्या मामूट्टी त्यांचे आडनाव होते, ज्यामुळे त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने पुकारायचे. त्यामुळे अभिनेत्याने आपल्या मोठ्या नावाऐवजी आडनावालाच स्टेज नावाच्या रूपात वापरले. त्यांनी ‘अनुभवंगल पालीचकल’ या मल्याळम सिनेमातून पदार्पण केले आणि साऊथचे सुपरस्टार बनले.

3. यश
‘केजीएफ’ स्टार यश (Yash) याचे जन्माच्या वेळी एक नाही, तर दोन नावे होती. कायदेशीररीत्या नवीन आणि त्याच्या आईच्या कुटुंबाने त्याचे नाव यशवंत ठेवले होते. तसेच, चित्रपट कारकीर्द सुरू होण्यापूर्वी इंडस्ट्रीतील इतर लोकांनी त्याला एक स्टेज नाव ठेवण्याचा सल्ला दिला होता. कर्नाटकमध्ये एका अभिनेत्याच्या रूपात खास नावाने उभे राहण्यासाठी त्याने यशवंत नाव छोटे करून यश ठेवले. त्यानंतर पुढे जो घडला तो इतिहास आहे. अभिनेत्याला ‘केजीएफ’ फ्रँचायझीमधील प्रतिष्ठित ‘रॉकी भाई’ या भूमिकेने यशाच्या शिखरावर पोहोचवले. आज त्याचे जगभरात चाहते आहेत.

4. धनुष
धनुष (Dhanush) याचे जन्मावेळचे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा असे होते. 1995मध्ये आलेल्या कुरुथिपुनल सिनेमातील काल्पनिक गुप्त ऑपरेशनने प्रेरित होऊन त्याने स्टेज नाव धनुष ठेवले होते. 2002मध्ये आलेल्या ‘थुल्लुवाधो इलमई’ या सिनेमातून त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आतापर्यंत 50हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. यादरम्यान त्याला 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

5. चिरंजीवी
सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे खरे नाव कोनिडेला शिवशंकर वर प्रसाद होते. मात्र, त्यांच्या कुटुंबाने त्यांचे नाव बदलून चिरंजीवी ठेवले. त्यांची आई हनुमानाची मोठी भक्त होती. त्यांच्या आईने अभिनेत्याचे नाव बदलून चिरंजीवी ठेवण्याचा सल्ला दिला. चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी 150 हून अधिक सिनेमात अभिनय केला आहे. तसेच, त्यांना तेलुगू सिनेसृष्टीतील मेगास्टार म्हणून ओळखले जाते.

6. नानी
रेडिओ जॉकी, सहाय्यकाच्या रूपात काम केल्यानंतर अभिनेता नानी याने ‘अष्ट छम्मा’ या सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. रंजक बाब अशी की, त्याचे खरे नाव नवीन बाबू घंटा, तर आडनाव नानी आहे. ‘दसरा’ फेम अभिनेत्याने सिनेमासाठी नानी नाव वापरले. त्यामुळे चाहते त्याला नानी नावानेच ओळखतात.

7. पवन कल्याण
साऊथ सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यानेही नाव बदलले आहे. त्याचे खरे नाव कोनिडेला कल्याण बाबू आहे. मात्र, सिनेमात आल्यानंतर त्याने स्वत:ला पवन कल्याण नाव दिले. (from rajinikanth to pawan kalyan this 8 south celebs who changed their birth know here)

महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! धोनीची पत्नी आहे 41 वर्षीय अभिनेत्याची Fan, पाहिलेत आतापर्यंतचे सगळे सिनेमे
ओपेनहायमर आणि ‘भगवद गीता’ वादावर ‘श्री कृष्णा’ची प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा