ऐकलंत का मंडळी! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनतोय बायोपिक; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर ट्विटरवर ट्रेंड

Gajendra Chauhan Is Making A Biopic of PM Narendra Modi Poster Trending On Twitter


प्रसिद्ध निर्माता बी. आर. चोप्रा निर्मित ‘महाभारत’ मालिका पाहिली नसेल, असा कदाचित एकही प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही. याच मालिकेत ‘युधिष्ठिर’ची भूमिका अमर करणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी आज प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. अनेकदा विवादांमुळे चर्चेत येणारे गजेंद्र ते नुकतेच म्हणजे रविवारी (२८ फेब्रुवारी) ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती.

रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. खरं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनवत आहेत. या बायोपिकचे शीर्षक ‘एक और नरेंद्र’ असे आहे. विशेष म्हणजे गजेंद्र स्वत: नरेंद्र मोदींच्या भूमिकेत झळकणार आहेत.

गजेंद्र चौहान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये त्यांचा लूक पाहायला मिळत आहे. ते पांढऱ्या रंगाच्या वाढलेल्या दाढीसह मोदींच्या रूपात दिसत आहेत. यासोबतच त्यांनी चश्मादेखील लावला आहे. पोस्टरमध्ये त्यांच्या मागे स्वामी विवेकानंद यांचा फोटो आणि मोदींचा एक फोटो दिसत आहे.

त्यांनी लिहिले की, “ही एक सन्मानाची बाब आहे की, मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. नरेंद्र मोदींचा हिंदी चित्रपट ‘#EkAurNaren’ ची सुरुवात काल रात्री कोलकातामध्ये एका भव्य मुहूर्तावर झाली. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात का?”

विशेष म्हणजे या ट्वीटवर अनेकांनी ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असे म्हटले आहे.

त्याचबरोबर काही युजर्सने ‘हा चित्रपट सुपर डूपर हिट होईल’, असेही म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे रे बाप.!! जेवढा लग्नात खर्च नाही झाला, तितका तर काडीमोड घेताना झालाय; पाहा बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट

-रस्त्यावर चुकूनही गाऊ नका ही गाणी, नाहीतर थेट जेलची हवा खावी लागेल! पाहा कोणती आहेत ती गाणी…..

-एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा


Leave A Reply

Your email address will not be published.