Saturday, December 7, 2024
Home अन्य कार्यक्रमात छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटीलने केली बेदम मारहाण? व्हिडिओ व्हायरल

कार्यक्रमात छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटीलने केली बेदम मारहाण? व्हिडिओ व्हायरल

आताच्या काळात गौतमी पाटील याच नावाची तुफान चर्चा आहे. लावणी डान्सर असणाऱ्या गौतमी पाटीलच्या डान्सने आजच्या तरुणाईला तुफान वेड लावले आहे. गौतमीचे नाव उच्चारले की, लावणीसोबतच अनेक वाद देखील ओघाने येतात. तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. खूपच कमी काळात गौतमीने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. काही महिन्यांपूर्वी गौतमीचा मराठी गाण्यावर स्टेजवर डान्स करत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ती अश्लील हावभाव करताना दिसली आणि काय गौतमी पाटील हे नाव कमी काळात लोकांना ओळखीचे झाले.

लावणी डान्सर असलेल्या गौतमीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तिच्या कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी देखील झाली होती. आता सोशल मीडियावर एका कार्यक्रमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत असून, याच गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने नृत्यांगनेची छेड काढली. त्यानंतर त्या नृत्यांगनेने त्या छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलीच मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तो कार्यक्रम आणि ती नृत्यांगना गौतमी पाटील असल्याचा दावा केला आहे. मात्र या व्हिडिओबाबत सत्यता अद्यापही समोर आली नाही.

गौतमीची क्रेझ एवढी आहे की आता ती चक्क एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाबा गायकवाड यांचा ‘घुंगरु’ या सिनेमात ती दिसणार असून या सिनेमाचे शूटिंग परदेशात होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शोमधून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट

शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा