Sunday, July 14, 2024

नात्यातील गुंतागुंत अधोरेखित करणाऱ्या दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित ‘गहराईया’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला ओटीटी चित्रपट ‘गहराइया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेशिवाय धैर्य करवा देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात अनेक रोमँटिक सीन देखील दाखवण्यात आले आहे.

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने ॲमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘गहराइया’चा मनोरंजक ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्याची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘गहराइया’ हा चित्रपट रिलेशनशिप ड्रामा आहे. ज्यात आजच्या नात्यातील गुंतागुंत आणि तरुणाईच्या आयुष्यातील खास पैलू आणि स्वत:च्या हिमतीवर जीवन मुक्तपणे जगण्याची इच्छा यांचे चित्रण आहे. या चित्रपटात धैर्य करवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. वायकॉम १८ स्टुडिओ आणि धर्मा प्रोडक्शन्स द्वारे जॉस्का फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटाचा ११ फेब्रुवारी रोजी वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना दीपिका म्हणाली की, “गेहराइयामध्ये मी अलिशा ही व्यक्तिरेखा साकारत आहे, जी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि हे नक्कीच मी पडद्यावर साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक पात्रांपैकी एक आहे. मला अशी मजेदार आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली, ज्यासाठी मी आभारी आहे. सर्व पात्रांचा संघर्ष आणि प्रवास अतिशय वास्तव, नैसर्गिक आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. आम्ही प्रेक्षकांना अशा प्रवासात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे की, ते त्यांच्याशी जोडले जातील. परस्पर संबंध आणि मानवी हृदयातील भावना या बाबतीत शकुनचे पडद्यावर प्रभुत्व आहे. ‘गहराइया’ या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा अशीच कथा रचली आहे, जी सर्वांनाच आवडेल.”

सिद्धांत म्हणाला की, “मला वाटते की, आपल्या सर्वांमध्ये माझी भूमिका, जैनचे काही चांगले गुण आहेत. त्याची मनापासून इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याची स्वप्ने पूर्ण करण्याची तळमळ आणि त्याला सामोरे जावे लागलेल्या कठीण आव्हानांचा आपल्या सर्वांच्या जीवनाशी संबंध आहे. ‘गहराइया’ हा चित्रपट आपल्या सर्वांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.”

अनन्या पांडे म्हणाली, “माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे मला ‘गहराइया’च्या अप्रतिम कलाकार आणि क्रूसोबत काम करायला मिळालं आणि मला इच्छा आहे की, इश्क शूट कधीच संपू नये! ‘गहराइया’च्या कथेत सत्याची झलक आहे; या चित्रपटात माणसाच्या नात्यातील गुंतागुंतीसोबतच कोणावर तरी प्रेम करण्याची मनातील थरारक भावना, स्वतःचे अस्तित्व शोधणे, स्वतःचा मार्ग शोधणे या गोष्टीही चांगल्या प्रकारे दाखविण्यात आल्या आहेत. टिया हे माझ्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे आणि शकुनने ज्याप्रकारे पडद्यावर प्रत्येक व्यक्तिरेखा साकारली आहे आणि आपल्यातील प्रत्येकातील सर्वोत्कृष्ट गोष्टी त्याच्या अनोख्या अंदाजात मांडल्या आहेत ते अतुलनीय आहे.”

काय आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  

ट्रेलरची सुरुवात दीपिकाने मला घरात राहायला आवडत नाही असे म्हणत होते. मला इथे अडकल्यासारखे वाटते. यानंतर तिच्याच बहिणीच्या प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याची कहाणी आहे. ‘गहराइया’ चित्रपटाची कथा एक नातेसंबंधाची आहे. जी गुंतागुंतीच्या आधुनिक नातेसंबंधांची कथा मांडते. या चित्रपटात दीपिकाने अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा