Friday, April 19, 2024

भरस्टेजवर गोविंदाने लगावली होती भाचा कृष्णाच्या कानशिलात, मुलगीही झाली होती आश्चर्यचकित!

बॉलिवूडची हिरो नंबर वन गोविंदा (Govinda) हा त्याची पत्नी सुनिता हिच्यासोबत अनेक रियॅलिटी शोमध्ये जात असतो. एकदा ते दोघे कृष्णा अभिषेकच्या (Krishna Abhishek) शोमध्ये गेले होते. तिकडे त्या दोघांनी कृष्णासोबत खूप मस्ती केली होती. या शोचा एपिसोड प्रदर्शित होताच खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात सगळे खूपच खुश दिसत होते. परंतु यादरम्यान गोविंदाने कृष्णाला कानाखाली मारली होती.

पडद्यामागची गोष्ट सांगायची झाल्यास, वैयक्तिक आयुष्यात कृष्णा आणि गोविंदा हे मामा- भाचे आहेत. आता काही वर्षांपासून यांच्या नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण झालाय. परंतु एकेकाळी त्या दोघांची खूपच चांगली मैत्री होती. गोविंदा आपली पत्नी सुनिता हिच्यासोबत एकदा कृष्णाचा शो ‘द ड्रामा कंपनी’ मध्ये गेला होता. तिथे त्यांनी या शोमध्ये कृष्णासोबत खूपच मस्ती केली होती. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यात कृष्णा असे म्हणतो की, “मी अनेक वेळा गोविंदा मामाची मिमिक्री केली आहे. पण आज त्यांच्या समोर मला त्यांची मिमिक्री करायला जमत नाहीये.”

त्यानंतर गोविंदा कृष्णाचे आभार मानतो आणि बोलता बोलता त्याच्या दोन कानाखाली मारतो. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची मुलगी देखील आश्चर्यचकित हैराण होते. पण त्यानंतर गोविंदा सविस्तरपणे सांगतो की, “लहानपणी कृष्णाच्या आईला असे वाटायचे की मी त्यांच्या मुलांना खूप मारतो, पण असे काहीही नसायचे. मी कधीच कोणाला मारलं नाही, तेव्हा कृष्णा गालावर हात ठेवून थांबायचा. त्यामुळे त्याला काही लागत नसायचं.” त्यानंतर गोविंदा असे सांगतो की, तो कृष्णाच्या आईला आपल्या आईसमान मानतो. कारण लहान असताना ते गोविंदाची खूप काळजी घेत असे. कारण त्याची आई कामाला जायची. त्यामुळे गोविंदाची सगळी काळजी कृष्णाची आई पद्मा हीच घेत असे.

त्यानंतर गोविंदाने खुलासा केला की, पद्माला लग्नानंतर ७-८ वर्ष अपत्य झाले नव्हते, तेव्हा गोविंदाने देवाकडे नवस मागितला की, जर पद्मा यांना अपत्य झालं, तर ते त्याला वैष्णोदेवीला घेऊन येतील. जेव्हा कृष्णाचा जन्म झाला, तेव्हा तो कृष्णाला वैष्णोदेवीला घेऊन गेला.

व्हिडीओ पाहा या लिंकवर क्लिक करुन- https://www.youtube.com/watch?v=4vPIZDoYaXE

ही गोष्ट अनेक चाहत्यांना माहिती नसेल की, कृष्णाची पत्नी कश्मिरा शाह हिने एका ट्वीटमध्ये अप्रत्यक्षपणे गोविंदाला लग्नात नाचणारा माणूस असे संबोधले होते. त्यामुळे त्या दोन्ही परिवारांमध्ये तिढा निर्माण झाला. त्यामुळे कृष्णा आणि गोविंदा यांच्या परिवारातील नाती बिघडली आणि ते अजूनही एकमेकांसोबत बोलत नाहीत.

हेही वाचा :

हे देखील वाचा