सुपर डान्सर ४: गोविंदासमोर त्याच्याच गाण्यावर ‘या’ मुलाने केली धमाल; डान्स पाहून अभिनेताही झाला हैराण


मागील काही काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब असणारा गोविंदा टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतो. गोविंदा म्हणजे डान्स आणि अभिनयाचे विद्यापीठच आहे. गोविंदाने ९० च्या दशकात जेवढी ओळख त्याच्या अभिनयाने, कॉमेडी चित्रपटांनी मिळवली, त्यापेक्षा अधिक लोकप्रियता त्याने त्याच्या डान्समुळे मिळवली. गोविंदाचे असंख्य असे गाणे आहेत, जे फक्त त्याच्या हटके डान्स स्टेप्समुळेच रसिकांच्या आजही लक्षात आहे. गोविंदाला आज प्रत्यक्ष डान्स करताना बघणे म्हणजे उपस्थितांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नाही.

गोविंदा सध्या वेगवगेळ्या रियॅलिटी शोमध्ये आपल्याला दिसत आहे. नुकतीच त्याने टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर ४’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शोमधल्या स्पर्धकांनी गोविंदाच्या हिट गाण्यांवर डान्स सादर केला. या शोमध्ये गोविंदा अभिनेत्री नीलमसोबत आला होता. यावेळी स्पर्धकांमधील प्रतिभा पाहून गोविंदा आणि नीलम आश्चर्यचकीत झाले होते.

याच स्पर्धकांमधील संचित नावाच्या मुलाचा डान्स पाहून तर गोविंदा हैराण झाला. संचितने ‘राजा बाबू’ सिनेमातील ‘पक चिक पक राजा बाबू’ गाण्यावर डान्स करत परीक्षकांसह नीलम आणि गोविंदाची वाहवा मिळवली. जेव्हा एक मोठा डान्सर दुसऱ्याला अधिक कमालीचा डान्स करताना बघतो, तेव्हा ती मोठी गोष्ट असते. संचितचा डान्स पाहून सर्वांनीच उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. संचितच्या डान्सची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, सोशलमीडियावरही अनेक युजर्स त्याचे टॅलेंट पाहून कौतुक करत आहेत.

गोविंदाबद्दल सांगायचे झाले, तर गोविंदाने त्याच्या अभिनयाची सुरुवात १९८६ साली आलेल्या ‘इल्जम’ सिनेमातून केली. त्यानंतर गोविंदाने अनेक सुपरडुपर हिट सिनेमे केले. कॉमेडी, गंभीर, ऍक्शन अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांमधून गोविंदाने त्याच्यातील प्रतिभावान अभिनेत्याचे दर्शन प्रेक्षकांना घडवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.