Friday, July 12, 2024

जेव्हा कॅटरिना आणि ‘हा’ अभिनेता बंद रूममध्ये करत होते एकमेकांना किस आणि झाली होती अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

आज कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात मोठी आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने तिच्या मेहनतीने आणि संघर्षाने तिचे नाव एक ब्रँड म्हणून या क्षेत्रात तयार केले आहेत. आज जरी कॅटरिना यशाच्या शिखरावर पोहचली असली तरी तिची या क्षेत्रातील सुरुवात आणि संघर्ष खूपच मोठा आणि खच खळग्यांनी भरलेला होता. कॅटरिनाने २००३ साली ‘बूम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिग्दर्शक कैजाद गुस्ताख यांचा हा सिनेमा जरी फ्लॉप ठरला असला तरी त्यात असणाऱ्या बोल्ड कॉन्टेन्टमुळे तो खूपच गाजला. या सिनेमात कॅटरिनाने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. त्यामुळे कॅटरिना खूपच गाजली. आजही तिच्या या सिनेमाची बऱ्याचदा चर्चा होताना दिसते.

या सिनेमात कॅटरिनाला दिग्गज अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबत एक किसिंग सीन द्यायचा होता. त्यासाठी त्या दोघांनी सराव देखील केला होता. या सीनच्या सरावाचा एक किस्सा देखील घडला होता. त्याबद्दल गुलशन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी या सिंच्यावेळी खूपच घाबरलो होतो. एका बंद खोलीत जाऊन मी आणि कॅटरिनाने या सीनचा सराव देखील केला. हा सराव आम्ही ज्या रूममध्ये करत होतो, तिथे अचानक अमिताभ बच्चन आले आणि त्यांनी सर्व पाहिले. तेव्हा आम्ही खूप अवघडली मात्र त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले होते. असे असूनही माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मात्र आम्ही कलाकार आहोत. मी बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्या भूमिकांमधून मी एक अभिनेता म्हणून प्रगती करत असून, कलाकाराने केलेल्या कामावर माझा विश्वास आहे.”

कॅटरिना आणि गुलशन यांचा हा सीन खूपच व्हायरल झाला होता. याबद्दल बोलताना कॅटरिना एकदा म्हणाली होती की, “हा सीन मी केल्याचे नाकारत नाही. मात्र तेव्हा माझी अवस्था खूपच अवघड झाली होती.”

हेही वाचा :

हे देखील वाचा