मिथुन चक्रवर्तीची सून असलेल्या मदालसाने ‘अनुपमा’मध्ये येण्यापूर्वी केले होते अनेक चित्रपटांत काम


टेलिव्हिजन क्षेत्राची पोहोच खूपच मोठी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना लोकप्रियता देखील तुफान मिळते. प्रत्येक घरात हे कलाकार पोहचतात आणि प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्यच होऊन जातात. या टीव्ही क्षेत्राची लोकप्रियता पहिली तर ह्याची भुरळ बॉलिवूड कलाकारांना देखील पडली आणि त्यांनी देखील या क्षेत्रात पाऊल टाकले. टेलिव्हिजन म्हटले की, डोळ्यासमोर येते ती मालिकांची रांग. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मालिका टीव्हीवर चालतात. या मालिकांची क्रेझ रसिकांमध्ये एवढी आहे की, पुढच्या भागात मालिकेत काय घडणार यावर अनेक तासांच्या चर्चा रंगतात. सध्या सर्वच घरांमध्ये एकाच मालिकेची चर्चा सुरु आहे, आणि ती म्हणजे ‘अनुपमा.’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखरच गाठले आहे. मालिकेसोबतच या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत बरेच ओळखीचे आणि काही अनोळखी चेहरे दिसत आहे. याच मालिकेतील महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे ‘काव्या.’ खलनायकी भूमिका असणारी ही व्यक्तिरेखा, खूपच गाजत आहे. ही व्यक्तीरेखा साकारणारी मदालसा शर्मा देखील खूपच लोकप्रिय झाली. आपल्या पहिल्याच मालिकेत तिने थोड्याच काळात प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. आज (२६ सप्टेंबर) मदालसा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबाबद्दल अधिक माहिती.

स्टार प्लसवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका असणाऱ्या ‘अनुपमा’ मालिकेत मदालसा ‘काव्या’ ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेने ती तुफान लोकप्रिय झाली. तिला या भूमिकेने न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळवून दिली. मदालसाची अजून एक ओळख म्हणजे बॉलिवूडमधील सुपरस्टार असणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांची ती सून आहे. मदालसाचा जन्म २६ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत झाला. तिची आई शीला शर्मा या देखील अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सहायक भूमिका केल्या आहेत. तर तिचे वडील सुभाष शर्मा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या मदालसाने मोठी झाल्यावर साहजिकच अभिनयाची वाट धरली.

अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने किशोर नमिता कपूर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे धडे गिरवले. याशिवाय तिने शामक दावर आणि गणेश आचार्य यांच्या डान्स स्कुलमधून डान्सचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. २००९ साली तिने ‘फिटिंग’ या तेलगू सिनेमातून अभिनीत पदार्पण केले. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड सिनेमातही काम केले आहे. याशिवाय तिने हिंदी, तामिळ, पंजाबी, जर्मन आदी भाषांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिला राजन शाही यांची ‘अनुपमा’ ही मालिका मिळाली, आणि तिच्या करिअरने मोठी उसळी घेतली.

मदालसाने जुलै २०१८ साली मिथुन चक्रवर्ती यांच्या मोठ्या मुलासोबत महाअक्षय (मिमोह) चक्रवर्तीसोबत लगीनगाठ बांधली. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना एकदा मदालसा म्हणाली होती की, “आम्ही दोघं एकमेकांना खूप वर्षांपासून ओळख होतो. माझी आईने मिमोहसोबत एक सिनेमा केला होता. यादरम्यानच एका कार्यक्रमाच्या वेळेस आमची भेट झाली. पुढे आम्ही चांगले मित्र झालो, वरचेवर भेटू लागलो. मैत्री प्रेमात बदलली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल सांगताना ती म्हणाली होती की, “माझे सासरे खूपच नम्र आहे. मी खूप नशीबवान आहे की, ते माझे सासरे आहे. दरवेळेस मला त्यांच्याकडून काहीतरी वेगळे शिकायला मिळते. ते मला माझ्या करिअरच्या दृष्टीने देखील खूपदा मार्गदर्शन करतात. किंबहुना त्यांच्या सांगण्यावरूनच मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आली.”

मदालसाला ‘अनुपमा’ या शोच्या निमित्ताने खूपच लोकप्रिय मिळाली. किंबहुना या शोनेच तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

 

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज


Leave A Reply

Your email address will not be published.