हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ८० आणि ९० चे दशक खूप महत्त्वाचे राहिले आहे. या दशकात बॉलिवूडने अनेक अभिनेत्रींना पडद्यावर राज्य करताना पाहिले. मात्र, आता या अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दक्षिण भारतीय अभिनेत्री माधवी होय. दक्षिण भारतीय चित्रपटांव्यतिरिक्त माधवी यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. त्या काळातील प्रत्येक दिग्दर्शकाची त्या पहिली पसंती असायच्या. मंगळवारी (१४ सप्टेंबर) माधवी आपला वाढदिवस साजरा करत असून ५९ व्या वयात पदार्पण करत आहेत.
माधवी यांनी दक्षिणेबरोबरच हिंदी चित्रपटांतही केले काम
माधवी यांचा जन्म १४ सप्टेंबर, १९६२ रोजी झाला होता. माधवीची गणना त्या अभिनेत्रींमध्ये होते, ज्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दक्षिण चित्रपटांपासून केली आणि त्यांनी नंतर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.
धूप में निकला ना करो रूप की रानी… तुम्ही हे गाणे तर ऐकलेच असेल. या गाण्यात माधवींनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स केला होता. आजही हे गाणे लोकांच्या ओठांवर आहे. ८० च्या दशकात माधवी बऱ्याच लोकप्रिय होत्या, पण काही काळानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला निरोप दिला.
माधवी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त, माधवी सुपरहिट चित्रपट ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटामध्येही साईड रोलमध्ये दिसल्या होत्या. याशिवाय माधवी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अंधा कानून’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांमध्ये काम केले.
माधवी यांनी तेलुगू चित्रपट ‘थुरपु पद्मारा’मध्ये काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ८० च्या दशकात त्या प्रत्येक दिग्दर्शकांची पहिली पसंती होत्या.
माधवी यांनी १४ फेब्रुवारी, १९९६ रोजी राल्फ शर्मा यांच्याशी लग्न केले. माधवी आणि राल्फ यांची पहिली भेट हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ योगा सायन्स आणि फिलॉसॉफी येथे झाली. यानंतर माधवी फक्त काही चित्रपटांमध्येच दिसल्या.
लग्नानंतर माधवी आपल्या पतीसह परदेशात शिफ्ट झाल्या. त्यांच्या पतीचा फॉर्मास्यूटिकलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलींची नावे प्रिस्किला, टिफनी आणि एव्हलिन आहे. माधवी आता पती आणि मुलींसह न्यू जर्सीमध्ये राहतात.
माधवी यांनी ‘मुझे शक्ती दो’, ‘मिसाल’, ‘लोहा’, ‘सत्यमेव जयते’, ‘प्यार का मंदिर’, ‘स्वर्ग’, ‘जखम’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्या शेवटच्या १९९४ मध्ये ‘खुदाई’ या चित्रपटात दिसल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव
-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत