×

राज ठाकरेंच्या आवाजाने दुमदुमणार चित्रपटसृष्टी, त्यांच्या आवाजातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

कोरोना काळात सरकारने अनेक निर्बंध लावले होते. मनोरंजन क्षेत्रावर याचा खूप मोठा परिणाम झाला होता. चित्रपटगृहे, नाटकगृहे सगळी बंद होती. कोरोनाचा प्रसार थोडा कमी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध कमी करून ५०% क्षमतेने चित्रपटगृहे खुली होतो केली. परंतु आता सरकारने १००% क्षमतेने चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. अशातच झी स्टुडिओचा प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन आले आहेत. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे व्हॉईस ओव्हरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या टिझरला आवाज दिला आहे. “जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा देणं गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षांनंतरच पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरा पगड आरोळ्याची आणि माझ्या छत्रपतींचा शिवगर्जनेचा गोष्ट आहे. हर हर महादेव.” ही वाक्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या आवाजात म्हटले आहे.

अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजही ‘हर हर महादेव’ हे शब्द नवसंजीवनी देणारे ठरतात. त्यामुळेच मराठी माणसाच्या हृदयात वसलेली, महाराष्ट्राच्या बुलंद आवाजातली स्वराज्याची सुवर्णगाथा मोठ्या पडद्यावर कशी दाखवणार हे जाणून घेण्यास आता प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत

हेही वाचा :

Latest Post