आपल्या रांगड्या स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा मराठी अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. हार्दिक जोशीने झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अक्षया देवधर ही मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतील त्यांचे राणा आणि अंजली हे पात्र एवढे गाजले होते की, सर्वत्र त्यांची त्याच नावाने ओळख निर्माण झाली.
या मालिकेचे शीर्षक गीत, कलाकारांचे संवाद, कोल्हापूरचा रांगडा बाज, पाठकबाईची हुशारी, राणाची कुस्ती, आणि त्यांच्यातील एक गोड प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. ही मालिका बंद होऊन आता बराच काळ लोटला आहे, पण आजही या मालिकेची सर्वत्र चर्चा असते. हार्दिक आणि अक्षयाची जोडी सर्वांना खूप आवडते. अशातच राणादा आणि अंजली पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या अक्षयाने शेअर केलेला हार्दिकसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही लग्नाच्या वेशात दिसत आहे. ते दोघेही एका जाहिरातीचे शूटिंग करत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिकने काळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. तसेच डोक्यावर फेटा बांधला आहे. तसेच गळ्यात काही हार घातले आहेत. यासोबत अक्षया देखील खूपच सुंदर दिसत आहे. तिने देखील काळ्या रंगाचा लेहंगा घातलेला आहे. गळयात डायमंडचा हार, हातात बांगड्या केसात गजरा असा सगळा साजशृंगार केला आहे. ते दोघेही हा लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहेत. त्यांची ही जोडी पुन्हा पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (hardik joshi and akshaya devkar again work together in upcoming project)
हार्दिक जोशी हा पुन्हा एकदा झी मराठी या वाहिनीवर झळकणार आहे. तो ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अमृता पवार दिसणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. ज्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या मालिकेत हार्दिकचा डॅशिंग आणि मॉर्डन लूक पाहायला मिळणार आहे. एकंदरीत ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे, असा अंदाज येत आहे. ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम










