Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘इंडियन आयडल’च्या मंचावर हेमा मालिनी यांनी बोलता बोलता सांगितला ‘हा’ गुपित किस्सा

‘इंडियन आयडल’च्या मंचावर हेमा मालिनी यांनी बोलता बोलता सांगितला ‘हा’ गुपित किस्सा

बॉलिवूडमधील ड्रीमगर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या काळामध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपाटमध्ये काम केले आहे. आजही त्यांच्या अभिनयाचे भरभरुन काैतुक केले जाते. त्यांनी हिरोइन नंबर वन बनण्यासारखा क्लासिक चित्रपट ‘सीता और गीता‘ याला 50 वर्षे झाली आहेत. त्यासोबतच ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाही चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा रिमेकसाठी अनेक प्रयत्न केले होते. या चित्रपटासाठी अभिनेता ऋतिक रोशन देखिल तयार झाला होता मात्र, ही गोष्ट कोर्टापर्यत पोहोचली त्यांमुळे याचा रिमेकर बनू शकला नाही. अभिनेत्रीने या चित्रपटादरम्यानचा नुकतंच एका कार्यक्रमामध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी नुकतंच एका रियालीटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांध्ये त्यांनी ‘सत्ते पे सत्ता’ या तचित्रपटाच्या शुटिंगवेळी त्यांनी एक किस्सा शेअर करत असताना आपल्या वैयक्तीक आयुष्यामधील एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांमुळे अभिनेत्री खुपच चर्चेतमध्ये आल्या आहेत.

सोनी चॅनेलवरील प्रसारित कार्यक्रम ‘इंडियन आइडल सीजन 13’ रविवार रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि मुलगी इशा देओल (Isha Deol) यांनी एकत्र हजेरी लावली होती. या कार्यक्रमामधील 11 स्पर्धकांपैकी कोलकत्ताची स्पर्धक अनुष्का पात्रा (Anushka Patra) हिने ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपाटतील ‘प्यार हमें किस मोड़ पे ले आया’ हे गाणे गायल्यानंतर कार्यक्रमाचा सुत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) याने अभिनेत्रीला चित्रपाटच्या जुन्या आठवणी सांगण्यास भाग पाडले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, “सर्वांना हा चित्रपट खूप आवडला. शूटिंगदरम्यान मलाही याचा खूप आनंद झाला. जेव्हा मला समजले की, या चित्रपटात सात भाऊ आहेत आणि या सात भावांच्या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे सचिन, शक्ती कपूर (Shakti Kapoor), कमलजीत. आणि सुधीर आदिचा समावेश आहे, जो सेटवर खूप खोडकर चाळे करत असे आणि त्यांचा मोठा भाऊ सर्वांचा बॉस होता.

हेमा मालिनी यांनी पुढे सांगितले की, “माझा पहिला सीन असा होता की, जेव्हा मी घरी येते तेव्हा मोठा भाऊ म्हणतो की, मला एकच भाऊ आहे. पण मग एक एक करून सगळे घरात येतात आणि इकडे तिकडे वस्तू फेकून घरात गोंधळ घालतात. त्याने माझ्याशी खोटं बोललं आणि त्याला एक नाही तर सात भाऊ आहेत हे पाहून मला धक्काच बसला. ही सर्व दृश्ये अप्रतिम होती.”

हे सगळं सांगत असताना अभिनेत्रीने आपला अशा गोष्ट देखिल सांगितली जी इंडस्ट्रीमधील खूप कमी लोकांना माहित होती. त्यांनी सांगितले की, “चित्रपट ‘सत्ते पे सत्ता’ वेळी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी इशा होणार होती. या चित्रपाटची शुटिंग कश्मिरमध्ये होणार होती आणि त्यावेळी श्रीनगर खूपच सुंदर होते. तिथेच ओबेरॉय हॉटेसपशी एक फार्महाउसही होते, जिथे आम्ही थांबलो होतो. आम्ही गुलमोहर आणि पहलगामध्येही शुटिंग केली होती. सांगायचे म्हणजे कश्मिर जन्नत आहे आणि त्या ठिकाणची लोकही खूपच प्रेमळ आहेत.” त्यांनी चित्रपटाचा अनुभव सांगत तेथिल सगळ्याच व्यक्तींना त्यांच्या आठवणीमधून कश्मिरला घेऊन गेल्यासारखं जावलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘आता ती वेळ आली आहे…’ म्हणत विद्युत जामवालने लैंगिक समस्यांसाठी सांगितले तब्बल 19 व्यायाम प्रकार
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! विद्युत जामवालच्या अभिनेत्रीला रस्त्यावर विकावी लागतेय भाजी

हे देखील वाचा