आदित्य नारायण पत्नीसाठी ठेवणार का करवा चौथचा व्रत? श्वेताने केला खुलासा

करवा चौथ आणि बॉलिवूडचे विशेष नाते आहे. मेहंदी, सर्गी, चाळणीतून चंद्र पाहण्यापासून ते उपवास तोडण्यापर्यंत, हा सण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर आणि रोमँटिक पद्धतीने सादर केला जातो. रील लाइफ व्यतिरिक्त, खऱ्या आयुष्यातही सेलिब्रिटी मोठ्या फिल्मी स्टाईलमध्ये ते साजरे करतात. अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक बॉलिवूड कलाकार आहेत, जे त्यांच्या पत्नीसोबत उपवास ठेवतात आणि त्यांच्या पत्नीच्या दीर्घायुष्याची इच्छा करतात. बॉलिवूडचा गायक आणि होस्ट आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेताचा आज पहिला करवा चौथ आहे. आदित्य आज तिच्यासाठी उपवास करेल की नाही, याबद्दल श्वेताने खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

श्वेता आज पहिल्यांदाच आदित्यसाठी करवा चौथचे व्रत करणार आहे. तिच्या या व्रतासाठी तोही खूप उत्साहित आहे. माध्यमांशी केलेल्या संभाषणात तिने सांगितले की, “मी पंजाबी आहे. मी लहानपणापासून आजी आणि आईला माझ्या कुटुंबात हा सण साजरा करताना पाहिले आहे. सुंदर कपडे परिधान करून पूजेचे ताट सजवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” पुढे ती म्हणाली की, “लग्नानंतर हे माझे पहिले व्रत आहे, त्यामुळे मला खूप उत्सुकता लागली आहे.”

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

करवा चौथचा उपवास ठेवणार आदित्य?
या संभाषणादरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आले की, आदित्य करवा चौथचे व्रत करणार आहे का? हे ऐकून ती मोठ्यााने हसली आणि म्हणाली, “नाही… तो उपवास नाही करत! मला वाटत नाही की, तो दोन तासांपेक्षा जास्त उपाशी राहू शकेल.”

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

नात्यात चढ -उतार पाहिले आहेत
आपल्या नात्याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, इतर नात्यांप्रमाणेच त्यानेही नात्यात चढ-उतार पाहिले आहेत. कधी खूप चांगला काळ, तर कधी खूप वाईट. तो हसला आणि म्हणाला की, “चांगल्या काळाचे बहुतेक श्रेय मला जाते.” आदित्य पुढे म्हणाला की, “आम्ही दोघे खूप वेगळे आहोत, पण आमच्यात अनेक समानता आहेत, ज्यांनी आम्हाला बांधून ठेवले आहे.”

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

काय भेट देईल?
पहिल्या करवा चौथला श्वेताला तू काय भेट देणार आहेस, असे त्याला विचारण्यात आले. तेव्हा उत्तर देत तो हसला आणि म्हणाला की, “मीच तिच्यासाठी भेट आहे.” पण नंतर त्याने सांगितले की, “श्वेताचा फोन जुना झाला आहे, म्हणून मी तिच्यासाठी एक नवीन फोन आणणार आहे.” गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी या दोघांचे लग्न अगदी साधेपणाने झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

ृ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ते ‘जहर’पर्यंत, करवाचौथच्या सीनमुळे ‘हे’ चित्रपट ठरले सुपरहिट

-यावर्षी ‘हे’ सेलेब्रिटी साजरे करणार त्यांचे पहिले करवा चौथ

-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Latest Post